पिंपरी-चिंचवड

खोपोलीजवळील अपघातात दोन महिलांचा मृत्यू

CD

तळेगाव दाभाडे, ता. २५ : वेगाने जाणाऱ्या ट्रेलरने सात वाहनांना धडक दिली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडला.
खोपोलीजवळील किलोमीटर ३७ परिसरात पुण्याहून मुंबईकडे वेगाने जाणारा ट्रेलर अचानक ब्रेक न लागता पुढे असलेल्या वाहनांवर आदळला. त्यावेळी ट्रेलरने सुरुवातीला इर्टिगा कारला धडक दिली, त्यानंतर सियाझ आणि ह्युंदायी या दोन कार्स तसेच एका बसला जोरदार धडक दिली. यानंतर स्विफ्ट कारला मागून धडक देत तिने समोरील बसच्या केबिनमध्ये घुसखोरी केली. स्विफ्टमधील प्रवासी गंभीर जखमी झाले.
या अपघातात स्विफ्टमधील अश्विनी अक्षय हळदणकर (वय अंदाजे ३०, रा. कोल्हापूर) आणि श्रेया संतोष अवताडे (वय १७, रा. घाटकोपर) या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. अन्य जखमींमध्ये वसुधा विजय जाधव (रा. कोल्हापूर), सारिका अवताडे (रा. घाटकोपर), सारिका विजय जाधव (वय ९), अविनाश विजय जाधव (वय ३, दोघेही रा. कोल्हापूर) आणि अक्षय हळदणकर यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, आयआरबी यंत्रणा, देवदूत आपत्ती व्यवस्थापन पथक, हेल्प फाउंडेशन व खोपोली पोलिस दाखल झाले. त्यांनी तत्काळ मदत व बचावकार्य सुरू करत जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Today: पेट्रोल-डिझेल महागल्यानंतर LPG गॅसचे नवे दर जाहीर; मुंबई-पुणेसह आता राज्यभरात गॅस सिलेंडर किती रुपयांना?

Akshay SL: LIVE मॅचमध्ये अचानक छातीत कळ अन् कर्नाटकच्या माजी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू

Latest Jobs : काम न करता मिळणार 3.7 कोटी रुपये पगार? OpenAI ने आणली अशी नोकरी, जाणून मोठमोठ्या इंजीनियर्सचं डोकं चक्रावलय

सरकारी रुग्णालयात खासगी लॅबचा सुळसुळाट; कमिशनखोर प्रशासनाचा वरदहस्त, रुग्णांची लूट

Nashik: गुरुजींना ५ लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य संरक्षण, वैद्यकीय बिले प्रतिपूर्ती बंद; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT