तळेगाव दाभाडे, ता. १६ ः कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल (साकव) कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेचा थरकाप उडवणारी चित्रफीत समोर आली आहे. आज दिवसभर ती प्रचंड व्हायरल झाली.
स्थानिक प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, सुमारे १०० ते १२५ पर्यटक पुलावर उपस्थित होते. पावसामुळे नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असतानाही काही पर्यटक पूल ओलांडत होते. त्याचवेळी पूल अचानक कोसळला. जखमींमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांतील व्यक्ती आहेत. त्यांच्यावर पवना, मायमर, अथर्व आणि युनिक हॉस्पिटल्स येथे उपचार सुरू आहेत. पूल कोसळतानाची चित्रफीत एका पर्यटक युवकाने मोबाईलवर चित्रित केली आहे. यात पूल एकीकडे झुकताना आणि लोक घाबरून मागे हटताना दिसत आहेत. काही क्षणांत पूल कोसळतो आणि अनेकजण त्यात पडतात, अशी दृश्य यात आहेत.
सध्या पुलाचे अवशेष क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू असून, जिल्हा प्रशासनाने घटनेचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.