पिंपरी-चिंचवड

डेंगीविरोधात जागृतीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग

CD

तळेगाव दाभाडे, ता. ३ : डेंगी आणि मलेरियासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेने शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रत्येक रविवारी प्रामुख्याने कोरडा दिवस पाळण्यासाठी छोटे-छोटे उपक्रम राबवायचे आहेत.
नगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची विशेष बैठक मंगळवारी (ता.३) नगरपरिषद कार्यालयात पार पडली. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी डेंगी-मलेरियामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य संकटाबाबत चिंता व्यक्त करत, प्रभावी उपाययोजनांची गरज अधोरेखित केली.
या पार्श्वभूमीवर प्रत्येक विद्यार्थ्याला आरोग्य पत्रक दिले जाणार आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार दर रविवारी घरातील पाणी साठा तपासणे, साचलेले पाणी काढणे, स्वच्छता राखणे, भांडी कोरडी ठेवणे असे उपक्रम राबवले जात आहेत. दर सोमवारी शिक्षक त्या कृतींची खातरजमा करून विद्यार्थ्यांना डेंगी व मलेरियापासून बचावाचे मार्ग समजावून सांगणार आहेत.
पंचायत समिती मावळचे विस्तार अधिकारी दिलीप ठोंबरे यांनीही बैठकीस उपस्थित राहून डेंगी प्रतिबंधक उपायांविषयी मार्गदर्शन केले.

घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एकदा पाणी साठवणाऱ्या भांड्यांची स्वच्छता करणे, मच्छरदाणी वापरणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे आदी उपाय महत्त्वाचे आहेत.
- दिलीप ठोंबरे, विस्तार अधिकारी, मावळ

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधून समाजात आरोग्यप्रती सजगता वाढेल. शाळा, विद्यार्थी व पालक यांच्यातून स्वच्छता मोहिमेला चालना मिळेल.
- विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी, नगर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Soybean Prices : शेतकऱ्यांच सोनं कवडीमोल भावात, सोयाबीनच्या भावावर शेतकऱ्यांची फरफट; ४ हजार ४०० रुपयांमध्ये खरेदी

Latest Marathi News Live Update : अनुसूचित जमातीमध्ये सहभागी करून आरक्षण देण्यात यावे , बंजारा समाजाचा धुळ्यात मोर्चा

Stanford University: ‘संजीवनी’च्या दाेन प्राध्यापकांचा अमेरिकेत संशोधनाचा झेंडा; सहा लाख संशोधकांत उच्चस्तरीय संशोधक म्हणून गणना

Bhoom Nagar Parishad Election : भूम नगरपरिषदेच्या दहा प्रभागाचे आरक्षण जाहीर; काही ठिकाणी खुशी काही ठिकाणी गम

SCROLL FOR NEXT