पिंपरी-चिंचवड

दुपारी मालगाड्या धावतात, मग लोकल का नाही?

CD

तळेगाव दाभाडे, ता. १० : ‘‘दुपारच्या वेळेत मालगाड्या नियमितपणे धावत आहेत. तर, मग लोकल रेल्वे का सोडली जात नाही? असा सवाल करत स्थानिक सामाजिक संघटनांनी मध्य रेल्वे प्रशासनाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रवाशांनी दिला आहे.

‘‘कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या दुपारच्या वेळेतील पुणे-लोणावळा उपनगरीय गाड्या पूर्ववत कराव्यात,’’ अशी मागणी गेल्या चार वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. पण, त्यावर मध्य रेल्वे प्रशासनाने आजपर्यंत कोणतीही ठोस कृती केलेली नाही. याशिवाय स्थानकावरील लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना कार्यरत करावे. दोन महिला पोलिसांची नियुक्ती व्हावी, प्रकाश व्यवस्था आणि स्वच्छता यांची व्यवस्था व्हावी आदी मागण्यात प्रवाशांनी केल्या आहेत.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा तळेगाव येथील निरंजन फलके, दिलीप डोळस, अमित प्रभावळकर, विलास सोनवणे यांनी दिला आहे. आता केवळ पत्रव्यवहार नाही, तर कृतीची गरज असल्याचे प्रवासी सांगत आहेत.

प्रवाशांच्या मागण्या...
- मुंबई-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेसला तळेगाव स्थानकावर जाता-येता थांबा द्यावा
- बारामती-कर्जत पॅसेंजर त्वरित पूर्ववत सुरू करावी
- कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्सप्रेस गाडी पूर्ववत मुंबईपर्यंत न्यावी
- पुणे-लोणावळा मार्गावरील दुपारच्या चार तासांमधील गाड्यांसह सर्व उपनगरी गाड्या नियमित कराव्यात.
- पुण्याहून दररोज रात्री १२.१५ वाजता सुटणारी तळेगाव गाडी पूर्वीच्या ११.१५ या वेळेलाच सोडावी.

संसदीय अधिवेशनात प्रश्न मांडावेत
खासदार श्रीरंग बारणे यांनी मे महिन्यात तळेगाव रेल्वे स्थानकावर प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना कामे विनाविलंब करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, अद्याप एकही मागणी पूर्ण झालेली नाही. २१ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. बारणे यांनी रेल्वेविषयीच्या समस्या मांडून प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ हजार देशील तरच... अभिनेता सुशांत शेलारने खंडणी मागितली? मराठी उद्योजकाचा थेट आरोप; रेकॉर्डिंगही ऐकवली

Supreme Court on Bihar SIR Case : बिहार 'SIR' बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘आता आधार कार्ड....’

Latest Marathi News Updates : नांदगाव मतदारसंघाच्या आमदाराची पंजाबमधील आपत्तीग्रस्तांसाठी ९ लाख रुपयांची आर्थिक मदत

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

PM Vidyalaxmi Yojana: टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय? मग सरकारकडून मिळवा 3% व्याज सवलतीचं शिक्षण कर्ज, जाणून घ्या अर्ज कसा करावा!

SCROLL FOR NEXT