पिंपरी-चिंचवड

‘सिंहगड एक्सप्रेसला तळेगाव स्थानकावर थांबा द्या’

CD

तळेगाव दाभाडे, ता. १८ ः तळेगाव रेल्वे स्थानकावर सिंहगड एक्सप्रेसला थांबा देण्यासाठी प्रवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुणे प्रवासी संघटनेच्या नेतृत्वाखालील या याचिकेत रेल्वे प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वकील नितेश नेवशे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, ‘‘वृद्ध, दिव्यांग, नोकरदार, विद्यार्थी आणि स्थानिक प्रवाशांना तळेगाव स्थानकावर थांबा नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोविडनंतर लोणावळा-पुणे लोकल सेवेची दुपारची गाडी बंद असून, खासगी प्रवास महागडा असल्यामुळे प्रवासी अडचणीत सापडले आहेत. रेल्वे प्रशासन मासिक पास जारी करत असले तरी अनेक गाड्यांमध्ये पासधारकांना प्रवेश दिला जात नाही. रिकाम्या सीट्स असूनही हा भेदभाव होत आहे, हे सरळ आर्थिक शोषण असल्याचा संघाचा आरोप आहे. पर्यायी उपाय म्हणून, याचिकेत दुपारी लोकल गाड्या वाढवणे, मासिक पासधारकांना सर्व गाड्यांमध्ये प्रवासाची मुभा देणे आणि आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तळेगाव हे औद्योगिक, शैक्षणिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठिकाण असून, इथून हजारो नागरिक दररोज प्रवास करतात. परंतु, त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.’’ या याचिकेची दखल घेत न्यायालयाने रेल्वे प्रशासनास नोटीस पाठवून उत्तर मागवले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘देवीचा अवतार घेऊ पाहिलं आणि स्टेजवरच अपमान झाला!’ ममता कुलकर्णीचा व्हिडिओ तुफान व्हायरल!

Nashik Elections : मतदारयादीत मनमानीला चाप; आयोगाचे प्रभागनिहाय याद्यांसाठी कठोर निर्देश!

Nagpur News: नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून संपवलं जीवन; पती-पत्नीसह तीन मुलांचा समावेश, का घेतला असा निर्णय?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुण्यात बॅनरबाजी

SCROLL FOR NEXT