तळेगाव दाभाडे, ता. १८ ः तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीतील सर्व दहीहंडी व गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी तसेच शांतता कमिटी, महिला दक्षता समिती, पत्रकार, ग्राम सुरक्षा दल, व्यापारी उद्योजक समिती सदस्य यांच्यासाठी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक शनिवारी (ता. १९) सायंकाळी ५ वाजता, सुशीला मंगल कार्यालय, लिंब फाटा, तळेगाव दाभाडे येथे होणार आहे.
सण-उत्सव काळात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था याबाबत नियोजन करण्यासाठी ही बैठक घेण्यात येत असून, पोलिस उपायुक्त (परिमंडळ २) पिंपरी चिंचवड व सहाय्यक पोलिस आयुक्त (देहूरोड विभाग) या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. तळेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सर्व संबंधित घटकांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून आगामी सण-उत्सव काळात कोणत्याही अडथळ्यांशिवाय सर्व उत्सव सुरक्षित आणि अनुशासित पद्धतीने पार पडतील.
---