पिंपरी-चिंचवड

मेट्रोमोनीयल साईटवरून ओळख; लग्नाचे आमिष दाखवून ११.८१ लाखांची फसवणूक

CD

तळेगाव दाभाडे, ता. २५ ः शिरगाव येथे मेट्रोमोनीयल संकेतस्थळावरून ओळख झालेल्या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेची ११ लाख ८१ हजार ७५१ रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव राकेश शेट्टी (रा. दक्षिण कन्नडा, कर्नाटक) आहे. नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत फसवणूक झाली. पीडित महिलेसोबत एका मेट्रोमोनीयल संकेतस्थळावरून आरोपीची ओळख झाली होती. शेट्टीने महिलेशी सतत संपर्क वाढवत, मेसेज आणि फोनद्वारे विश्वास निर्माण केला. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने महिलेच्या क्रेडिट कार्ड, कर्ज अ‍ॅप्स आणि बँक अ‍ॅप्स चा वापर करत तिच्या नावावर कर्ज घेतले. त्यानंतर आरोपीने महिलेशी अचानक संपर्क तोडला व तिची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. पीडितेच्या तक्रारीवरून शिरगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : महिला IPS प्रकरणात रोहित पवारांनी अजितदादांची बाजू घेतली की टोमणा मारला? नेमकं काय म्हणाले?

Korean Kimchi: आंबट तिखट अन् खमंग चवीचं कोबीचं लोणचं म्हणजेच कोरियन किमची नक्की आहे तरी काय?

कुत्र्यामुळे मोडला संसार! बॉलिवूड अभिनेत्याच्या लग्न मोडण्याचं कारण ठरला कुत्रा, नक्की काय झालेलं...

Nashik News : मविप्र विद्यापीठाबाबत गैरसमज कशासाठी? संस्थेचे थेट स्पष्टीकरण!

Shivraj Bangar On Laxman Hake: 'ज्या गावच्या बोरी त्याचं गावच्या बाभळी असतात' | Sakal News

SCROLL FOR NEXT