पिंपरी-चिंचवड

जुन्या महामार्गावर दिवसा देहविक्री

CD

तळेगाव दाभाडे, ता. ४ : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा, वडगाव फाटा आणि तळेगाव दाभाडे शहरातील काही ठिकाणी भरदिवसा खुलेआम देहविक्री सुरू आहे. दिवसा किंवा रात्री-अपरात्री या महिला रस्त्यावर उभ्या असतात. विशेष म्हणजे त्यांच्या आसपास चारचाकी वाहनही उभे असते. त्यामुळे स्थानिक नागरिक, विशेषतः महिला व मुलींना प्रवास करताना असुरक्षितता वाटते. या परिसरात वसाहती, शाळा-महाविद्यालये, कंपन्या असल्याने नागरिकांची कायम वर्दळ असते. त्यानंतरही वेश्याव्यवसाय उघडपणे सुरू राहणे चिंतेची बाब आहे. काही ठिकाणी तृतीयपंथीयांचाही सहभाग दिसतो. स्थानिक पोलिस अधूनमधून कारवाई करीत असले तरी ही वारंवार उद्भवते. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून तसेच गुप्त पद्धतीने तपास मोहीम राबवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याविषयी सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी सांगितले की, ‘जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा, सीआरपीएफ, वडगाव, तळेगाव अशा अनेक ठिकाणी रस्त्यावरच वेश्याव्यवसाय सुरू असतो. या भागात नागरिक आणि महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.’
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Crime: 17 वर्षीय मुलीचा लग्नास नकार, व्यक्ती संतापला, रागात घरात घुसला अन्...; नको ते घडलं!

Woman Suspicious Death : शेतात वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, चंदगडमधील घटना; फॉरेन्सिक लॅबची घेणार मदत

ZP, पंचायत समिती निवडणूक सोपी राहिली नाही, ३ कोटी अन् १०० बोकड; कार्यकर्ते उद्ध्वस्त होतात, शिंदेचे आमदार काय म्हणाले?

Eknath Shinde उपमुख्यमंत्री शिंदेंचा सोशल मीडिया हॅक, Xच्या खात्यावर हॅकर्सनी व्हिडीओ पोस्ट केल्यानं खळबळ

BCCI President : बीसीसीआयचा अध्यक्ष ठरला? माजी क्रिकेटपटूचं नाव चर्चेत...असा खेळाडू जो आपल्याला आठवतंही नसेल; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT