पिंपरी-चिंचवड

तळेगाव नगरपरिषद निवडणूक

CD

तळेगाव दाभाडे, ता. २० ः तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या ९६ उमेदवारी अर्जांपैकी गुरुवारी सात उमेदवारांनी माघार घेतली असून, आता ८९ अर्ज शिल्लक आहेत. तर प्रभाग क्रमांक दोनमधून संदीप बाळासाहेब शेळके तर प्रभाग क्रमांक चारमधून काकडे गणेश मोहनराव हे बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी शुक्रवारी (ता. २१) दुपारी तीनपर्यंत अंतिम मुदत आहे.
तळेगावात बुधवारी चार उमेदवार बिनविरोध झाले होते. त्यामुळे आतापर्यंत सहा जागांवर बिनविरोध निवड झाली असून, याबाबतची अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे. नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युती झाली असून, या युतीत राष्ट्रवादी काँग्रेसला १७ तर भाजपला ११ जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. आतापर्यंत बिनविरोध झालेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवारांचा समावेश आहे. एकूण २८ पैकी सहा जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित २२ जागांसाठी ८९ उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज दाखल आहेत.

अपक्षांची माघार घेण्यासाठी महायुतीची धावपळ
माघार घेण्याच्या अंतिम दिवसापूर्वी महायुतीतील नेत्यांनी गुरुवारी अपक्ष इच्छुकांशी संपर्क साधत मोठे प्रयत्न केले. काहींना वेगवेगळी आश्वासनेही देण्यात आली. मात्र, अपेक्षित यश मिळाले नाही. अनेक उमेदवारांनी माघार घेण्यास नकार दिल्यानंतर गुरुवारी होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते. यानंतर शहरात महायुती तुटल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, याबाबत महायुतीतील पदाधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

आज निर्णायक दिवस
शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. २२ जागांसाठी अद्याप ८९ अर्ज शिल्लक असल्याने आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. भाजपच्या काही इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले असून, त्यांनी माघार घेतली नाही, तर युतीत धुसफूस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Government Job Fraud : एकाच वेळी दोन-दोन सरकारी नोकऱ्या करत होता पठ्ठ्या, ३३ वर्षे घेतला पगार; कोर्टाने सुनावली ७ वर्षांची शिक्षा

हे, भाऊ शोभतात! बांगलादेशचे दोन्ही फलंदाज एका दिशेला, पाकिस्तानच्या खेळाडूंनी काय केलं पाहा Video Viral

Government Stray Dog Policy : शिकवायचं की कुत्री मोजायची? आता भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर? सरकारचा अजब फतवा, काय आहे नेमका प्लॅन?

Latest Marathi News Live Update : एलपीजी गॅस सिलेंडर टंचाईची झळ आता गडचिरोली शहराला

स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट, म्हणाल्या...'गेली दोन वर्ष मी...'

SCROLL FOR NEXT