पिंपरी-चिंचवड

तळेगावात मतदानात निरुत्साह

CD

तळेगाव दाभाडे, ता. २ ः नगरपरिषद निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदारांचा निरुत्साह होता. एकूण २८ पैकी १९ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. सहा सदस्यांचे मतदान २० डिसेंबरला होणार आहे. आज झालेले मतदान १४ प्रभागांत नगराध्यक्षपदासाठी तर केवळ तीन प्रभागात चार सदस्यांसाठी मतदान होते. त्यामुळे सकाळपासूनच मतदारांचा उत्साह कमी दिसत होता.
नगराध्यक्षपदासाठी महायुतीचे उमेदवार संतोष दाभाडे, अपक्ष उमेदवार किशोर भेगडे आणि रंजना भोसले असे तीनजण रिंगणात होते. सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वी महायुतीचे उमेदवार व अपक्ष उमेदवार यांचे बूथ लावलेले होते. त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची गर्दी होती. मतदारांना स्लीप वाटप, मतदान कोणत्या केंद्रात आहे, याची माहिती दिली जात होती.
निवडणूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दुपारी साडेतीनपर्यंत ३६.५७ टक्के, दुपारी साडेतीनपर्यंत पुरुष मतदारांची संख्या १२ हजार ५३० होती. ११ हजार १२२ महिला मतदारांनी मतदान केले. २३ हजार ६५२ मतदारांनी या वेळेपर्यंत मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. नगर परिषदेसाठी ३६.५७ टक्के मतदान नोंदविण्यात आले. दुपारी साडेतीनपर्यंत पुरुष मतदारांची संख्या १२ हजार ५३० होती. तर ११ हजार १२२ महिला मतदारांनी मतदान केले. इतर मतदारांची संख्या शून्य असून, २३ हजार ६५२ मतदारांनी या वेळेपर्यंत मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. नगर परिषदेसाठी ३६.५७ टक्के मतदान नोंदविण्यात आले. मतदानाची कमी टक्केवारीची चर्चा सुरू झाल्यानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांची मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लगबग सुरू झाली. साडेचार ते साडेपाच या तासाभरात काहीशी मतदानाची टक्केवारी वाढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

Success Story: श्वेता पवार खेळाडू कोट्यातून राज्यात प्रथम; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, संघर्षातून एमपीएससीमधील तिसरे यश!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

SCROLL FOR NEXT