पिंपरी-चिंचवड

तळेगावच्या उपनगराध्यक्षपदाची मंगळवारी निवड

CD

तळेगाव दाभाडे, ता.७ : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासह तीन स्वीकृत सदस्यांच्या निवडणुका मंगळवार (ता.१३) होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली. या निवडणुकीकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे आता लक्ष लागले आहे.
या निवडणुकांसाठी नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी संतोष दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेची विशेष सभा होणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत एकूण २८ सदस्य असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १७ तर भाजपचे १० सदस्य आहेत. उर्वरित एक सदस्य अपक्ष आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने निवडणूक लढवली होती. संख्याबळाच्या आधारे सत्तास्थानी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची महायुती स्थापन झाली आहे.
महायुतीतील ठरलेल्या सामंजस्यानुसार पहिल्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपदाची संधी संतोष दाभाडे यांना देण्यात आली असून उर्वरित अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश काकडे यांना नगराध्यक्षपद देण्यात येणार आहे. त्यानुसार सध्याच्या टप्प्यावर उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्वीकृत सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, तर भाजपचा एक सदस्य निवडला जाणार आहे. दोन्ही पक्षांचे स्वतंत्र गट स्थापन झाले असून संख्याबळानुसार ही निवड होणार आहे. या निवडणुकीबरोबरच याच सभेत गटनेते तसेच विरोधी पक्षनेत्यांची निवडही करण्यात येणार आहे.
नगरपरिषदेत यंदा २१ नवे चेहरे निवडून आले असून सात नगरसेवकांची फेरनिवड झाली आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये भेगडे आडनावाचे पाच, शेळके व खांडगे आडनावाचे तीन, तर दाभाडे, खळदे व भगत आडनावांचे प्रत्येकी दोन नगरसेवक आहेत. त्यामुळे नगरपरिषदेतील सत्ताकारणात नव्या चेहऱ्यांचा प्रभाव वाढल्याचे चित्र आहे.
दरम्यान, उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य पदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून अनेक नगरसेवकांनी पहिली संधी मिळावी, यासाठी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पदांची मुदत प्रत्येकी सहा महिन्यांची असणार आहे.

आगामी पाच वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांना उपनगराध्यक्षपदाची संधी देण्याबरोबरच स्वीकृत सदस्य पदांवर सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.
- गणेश खांडगे, अध्यक्ष, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

Truck Eicher Accident : भरधाव ट्रकची आशरला पाठीमागून धडक; भिषण अपघातात दोघांचा मृत्यू, ८ शेळ्या दगावल्या

फक्त ३३ किमी रुंद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे कशी जातात?

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT