पिंपरी-चिंचवड

अहिल्यादेवी होळकर स्मारक नामकरणाची तळेगावात मागणी

CD

तळेगाव दाभाडे, ता. १० ः तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्याची तसेच नगरपरिषद हद्दीतील शासकीय उद्यान किंवा सार्वजनिक इमारतीस त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय, दूरदृष्टीच्या व लोककल्याणकारी प्रशासक होत्या. धर्म, संस्कृती, सामाजिक समता, स्त्री सशक्तीकरण व आदर्श प्रशासनाचे त्यांनी उदाहरण घालून दिले. तळेगाव दाभाडे हे ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर असल्याने मारुती मंदिर चौक येथे त्यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी नागरिक, सामाजिक संघटना व इतिहासप्रेमींनी केली आहे. तसेच नगरपरिषद हद्दीतील उद्यान, सार्वजनिक इमारत, सभागृह किंवा चौकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. या मागणीवर नगरपरिषदेने सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती भेगडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economic Crisis: पाकिस्तान व फिलिपिन्समध्ये चार दिवसांचा आठवडा; दरवाढीमुळे आपत्कालीन उपाययोजना, इंधन वाचविण्याचा प्रयत्न!

ICC T20I Rankings: वरुण चक्रवर्तीनं 'नंबर वन'चा ताज गमावला, तर अभिषेक शर्माच्या सिंहासनाला इशान किशनचं देतोय आव्हान

Sarpanch Bribe Case : गरीब ग्रामस्थाची झोपडी दुरुस्त करण्यासाठी सरपंचाने 15 हजारांची मागितली लाच, 'असा' अडकला जाळ्यात!

Kalamb Municipal Council Tightens Rules Against Garbage Dumping: कळंबमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर; नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Iran Missile Attack: सततच्या हल्ल्यांमुळे तणाव कायम; इराणकडून आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले, शस्त्रसंधी नाहीच!

SCROLL FOR NEXT