तळेगाव दाभाडे, ता. १३ ः तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश काकडे यांची बिनविरोध निवड झाली. स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी आगळे, बाबा मुलानी आणि भाजपचे सूरज सातकर यांची निवड जाहीर करण्यात आली.
निवडीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुती झाली होती. त्यात नगराध्यक्षपदी भाजपचे संतोष हरिभाऊ दाभाडे यांची निवड झाली होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १७, भाजपचे १० तर एक अपक्ष असे एकूण २८ नगरसेवक विजयी झाले होते.
उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी पहिली सर्वसाधारण सभा मंगळवारी नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, गटनेत्या हेमलता खळदे, पक्षप्रतोद सत्यम खांडगे, भाजपचे गटनेते इंदरमल ओसवाल यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
निवडीनंतर आमदार सुनील शेळके, बबनराव भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, सुधाकर शेळके, भाजपचे माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, कृष्णा कारके, सुरेश धोत्रे, दर्शन खांडगे, अनिकेत भेगडे यांच्यासह इतर पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत काकडे तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
काकडे यांनी यापूर्वी तीन वेळा नगरसेवक, विरोधी पक्षनेते व उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. महायुतीतील ठरावानुसार अडीच वर्षांनंतर त्यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. स्वीकृत सदस्यपदी निवड झालेले आगळे, मुलानी व सातकर हे तिघेही निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले, “नगरसेवक, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष होण्याचा मान मतदारांनी तुम्हाला दिला आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून तळेगाव दाभाडे शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रितपणे काम करावे.”
नगराध्यक्ष दाभाडे म्हणाले, “शहराच्या विकासाठी सर्वांना बरोबर घेऊन शहराचे मूलभूत प्रश्न सोडवले जातील.” उपनगराध्यक्ष काकडे म्हणाले, “येत्या चार महिन्यांत शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येईल. नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील.” विरोधीपक्ष नेते संतोष भेगडे म्हणाले, “कामात अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा किंवा चुकीचे काम केल्यास त्याला विरोध केला जाईल.”
---
फोटो
गणेश काकडे
शिवाजी आगळे
बाबा मुलानी
सूरज सातकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.