पिंपरी-चिंचवड

‘असे दादा पुन्हा होणे नाही, मिळणे नाही’

CD

तळेगाव दाभाडे, ता. २८ : ‘‘महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देत वेगाने पुढे नेणारे, ठाम निर्णयक्षमता, कार्यतत्परता आणि आपुलकीचा स्पर्श असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आकस्मिक जाणे अजूनही मनाला स्वीकारता येत नाही. असे दादा पुन्हा होणे नाही; मिळणे नाही,’’ अशा शब्दांत मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘‘अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूची घटना खरी आहे, हे मान्य करायला आमचे मन तयार होत नाही. मावळच्या विकासाला एका उंचीवर नेताना दादांनी माझा हट्ट पुरवताना कधीही आढेवेढे घेतले नाहीत. मी जे मागितले त्यापेक्षा कितीतरी अधिक त्यांनी दिले. मावळचा विकास हा त्यांच्या मनात कायम होता. आज दादा आपल्यात नाहीत, ही जाणीवच माझ्यासह मावळातील शेकडो कार्यकर्त्यांना निशब्द करणारी आहे,’’ असे शेळके म्हणाले.
‘‘दादा आणि माझे संबंध गेल्या सहा-सात वर्षांपासून अतिशय जिव्हाळ्याचे होते. जाहीर सभांमधील त्यांचे आश्वासक शब्द, लोकांसमोर मिश्किल पण तितक्याच आपुलकीने केलेली टिप्पणी आणि मावळातील जनतेवर असलेले त्यांचे खास प्रेम हे अजित पवार यांनी कृतीतून दाखवून दिले. आज दादांचे नसणे हे अनाकलनीय आहे. विकासकामांसाठी मी दादांकडे हट्ट करायचो. आता तो कुणाकडे करायचा, हा प्रश्न बोचत आहे. दादांचा अखेरचा निरोप घेतानाचा क्षण पोरका करणारा आहे. पवार कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण मावळ तालुका सहभागी आहे,’’ अशा शब्दांत शेळके यांनी आपल्या भावनाा व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT