पिंपरी-चिंचवड

पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल यादवेंद्र खळदे कॉंग्रेसमधून निलंबित

CD

तळेगाव दाभाडे ः येथील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीने तळेगाव शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे यांना पदावरून निलंबित केले आहे. खळदे हे ३० वर्षांपासून शहराध्यक्ष पदावर कार्यरत होते. मात्र, निवडणुकीतील त्यांच्या संशयास्पद हालचालींमुळे पक्षाने अखेर हा कठोर निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारात यादवेंद्र खळदे यांनी कोणताही सहभाग घेतला नाही. याउलट ते महायुतीचे आमदार सुनील शेळके यांच्या पॅनेलमध्ये सक्रिय असल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले होते. महायुतीच्या घटक पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करून त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांविरुद्ध काम केल्याचे निष्पन्न झाले

खुलासा देण्यासही टाळाटाळ
पक्षाने या गंभीर प्रकाराची दखल घेत खळदे यांना आठ दिवसांत खुलासा करण्याची ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. मात्र, या नोटिशीला त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही किंवा जिल्हा कमिटीकडे कोणताही अहवाल सादर केला नाही. यावरून त्यांनी पक्षादेशाला गांभीर्याने घेतले नसल्याचे स्पष्ट झाले, परिणामी त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी या कारवाईचे आदेश दिले आहेत. इथून पुढच्या काळात खळदे यांना पक्षाशी निगडित कोणताही अधिकृत निर्णय घेण्याचा अधिकार राहिलेला नाही, असेही पक्षाने स्पष्ट केले आहे. या कारवाईची प्रत माहितीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीलाही पाठवण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खळदे यांनी दाखविलेली निष्क्रियता आणि पक्षविरोधी भूमिकेमुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

SCROLL FOR NEXT