पिंपरी-चिंचवड

खडकाळामध्ये ६० टक्के मतदान

CD

तळेगाव दाभाडे, ता. ७ ः खडकाळा कार्ला मतदार संघात सर्वाधिक मतदान कामशेत शहरात असल्याने सर्वपक्षीय उमेदवारांनी या शहरात लक्ष केंद्रित केले होते. कामशेत येथील सर्व मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी चार वाजेपर्यंत ६० टक्के मतदान झाले.
खडकाळा कार्ला जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपाली दीपक हुलावळे, खडकाळा पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर जाधव, खडकाळा-कार्ला जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या आशा बाबूराव वायकर, तर पंचायत समिती गणात प्रकाश गायकवाड हे तुल्यबळ उमेदवार आहेत. कामशेत शहरातील जास्तीत जास्त मतदान आपल्याला व्हावे यासाठी सकाळपासूनच उमेदवार आणि कार्यकर्ते सज्ज झाले होते. मतदारांच्या स्लीप, मतदान क्रमांक, मतदान कुठे आहे याची माहिती घेण्यासाठी बूथ वर मतदारांची गर्दी झाली होती. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. साडेनऊ पर्यंत सर्व मतदान केंद्रावर गर्दी होती. दुपारी मतदानाचे प्रमाण थोडे कमी झाले. चारनंतर पुन्हा मतदानाचा वेग वाढला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: हा कसला 'देवदास'; तो तर रोज 'पारो' बदलतो! आशिष नेहराचे On Air हार्दिक पांड्याबद्दल वादग्रस्त विधान

Karjat ZP Election Result : कर्जतमध्ये आमदार थोरवे यांच्या सुनबाई पराभूत; संपूर्ण निकाल समोर

Pune News : ‘लाडक्या बहिणीं’वर खैरात, मात्र ‘लाडक्या भावां’च्या ताटात खडखडाट! निर्वाह भत्ता मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

कसा झालेला विनोद खन्ना यांचा मृत्यू? दुसऱ्या पत्नीने अनेक वर्षांनंतर मौन सोडलं; म्हणाल्या, 'शेवटच्या दिवसात तर...'

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: मावळमध्ये भाजपला मोठा धक्का; १५ पैकी एकही जागा जिंकता आली नाही

SCROLL FOR NEXT