पिंपरी-चिंचवड

श्री छत्रपती शिवशंभू स्मारक उत्सवांसाठी तरतूद करा

CD

तळेगाव दाभाडे, ता. १० : तळेगाव दाभाडे येथील श्री छत्रपती शिवशंभु स्मारकाचे ॲाक्टोबर २०२५ मध्ये लोकार्पण झाले. या परिसरात वर्षभर ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे. स्मारकाच्या देखभाल व विकासासाठी नगर परिषदेकडून अर्थसंकल्पात स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी श्री शिवशंभू स्मारक संस्थेने केली आहे.
या संदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. ‘‘श्री शिवशंभू स्मारक येथे शिवजयंती, शिवराज्याभिषेक दिन, विविध जयंती-उत्सव, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जावेत, यासाठी निधीअभावी अनेक उपक्रम राबविताना अडचणी येतात. स्मारकाच्या जतन, स्वच्छता, प्रकाशयोजना व परिसर विकासासाठी तसेच वार्षिक उत्सवांसाठी नगर परिषदेकडून आर्थिक तरतूद झाल्यास अधिक दर्जेदार सुविधा देता येतील,’’ असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त व माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे, माजी नगरसेवक सुरेश दाभाडे, संदीप जगनाडे, कोषाध्यक्ष संजय बाविस्कर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भिमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही

Pune Crime: साखरपुड्यानंतर केतनला आलेली शंका, सियाचं बॅकग्राउंड माहितीय का? वडिलांना केलेली विचारणा पण...

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर मोठी घडामोड! सुनावणीत राज्य सरकारचा युक्तिवाद; पूर्वीच्या आयोगातील त्रुटी दूर झाल्याचा दावा

Nashik Girl Death VIDEO : लस टोचून घेतल्यानंतर चक्कर येऊन पडली, 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत; दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील घटना

Karad Flyover Update : पुणे-बंगळूर महामार्गावरील कराडचा उड्डाणपूल कधीपासून सुरू होणार? तीन दिवसांची चाचणी पूर्ण; पुलावर सध्या काय काम सुरुये?

SCROLL FOR NEXT