पिंपरी-चिंचवड

कामशेत ग्रामपंचायतीत २५ कोटींची विकासकामे

CD

तळेगाव दाभाडे, ता १९ : कामशेत ग्रामपंचायतीचे सरपंच रूपेश अरुण गायकवाड यांनी २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कार्यकाळात सुमारे २५ कोटी रुपयांच्या विकासकामांचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत सादर केला. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित परिषदेत त्यांनी विविध महत्त्वाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
येत्या २४ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने सरपंच रूपेश गायकवाड यांनी आढावा मांडला. या पत्रकार परिषदेला माजी उपसरपंच नीलेश दाभाडे, दत्तात्रेय शिंदे तसेच सदस्य परेश बरदाडे उपस्थित होते. गायकवाड यांनी ग्रामस्थांनी पाच वर्षे काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत स्थापनेपासून प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, त्या निधीतून पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
कामशेत शहरातील मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यांची कामे, महिलांसाठी सांस्कृतिक भवन उभारणी, नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम, निवाराशेड उभारणी आणि पाणीपुरवठा व्यवस्थेतील सुधारणा अशी अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या विकासकामांमुळे गावाच्या प्रगतीला गती मिळाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या पाच वर्षांत नकळत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यापुढील काळात निवडणूक लढवो अथवा न लढवो, जनतेच्या प्रश्नांसाठी कायम तत्पर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

Gas Cylinder Black Market : घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT