पिंपरी-चिंचवड

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे उपक्रम

CD

तळेगाव दाभाडे, ता. २३ : संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने ‘स्वच्छतादूतांचा सन्मान’ हा उपक्रम राबविण्यात आला. नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम साकारण्यात आली.
शहरातील विविध भागांत नागरिकांनी परिसरातील स्वच्छतादूतांचे औक्षण केले. अनेक ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली, तर काही वस्त्यांमध्ये शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. नागरिकांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेमुळे स्वच्छतादूतांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून ती समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश यावेळी देण्यात आला.
हा उपक्रम एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर स्वच्छतादूतांप्रति आदर राखावा आणि कचरा व्यवस्थापनात त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA : 'गौतम, सूर्या यांच्या दोन चुकांमुळे भारतीय संघ हरला'; द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर R Ashwin चांगलाच संतापला

AI Library: विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी! देशातील पहिले 'एआय डिजिटल ग्रंथालय' उघडणार, कुठे आणि कधी होणार सुरू?

Wani News : जगातील एकमेव पद्मासनस्थित दत्तमूर्ती असलेल्या करंजी देवस्थानचा आता होणार कायापालट; शासनाचा मोठा निर्णय

Horscope : उद्यापासून 4 राशीच्या लोकांचा गोल्डन टाइम सुरू! कष्टाला नशिबाची जोड; नोकरी-धंद्यात मोठे यश, रखडलेली कामे पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT