पिंपरी-चिंचवड

मालमत्ताकर भरण्यासाठी आता ऑनलाइन सुविधा

CD

तळेगाव दाभाडे, ता. २७ : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रशासनाने शहरातील मिळकत धारकांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवा संकेतस्थळावर मालमत्ताकराची संपूर्ण माहिती अपलोड करण्यात आली आहे. यामुळे आता नागरिकांना मालमत्ताकर भरण्यासाठी नगरपरिषदेच्या कार्यालयात चकरा मारण्याची किंवा रांगेत उभे राहण्याची गरज उरलेली नाही.
नागरिक आता घरबसल्या भ्रमणध्वनी किंवा संगणकाच्या माध्यमातून केवळ काही मिनिटांत मिळकतकराचा भरणा करू शकतील. संगणकीकृत पद्धतीमुळे वेळेची बचत, पारदर्शकता आणि व्यवहारातील अचूकता सुनिश्चित होणार आहे. नगरपरिषद प्रशासनाने सर्व मिळकत धारकांना ऑनलाइन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. वेळेवर मिळकतकर भरल्यास दंड व व्याज टाळता येईल आणि शहराच्या विकासकामांना गती मिळण्यास मदत होईल.

तीन टप्प्यांत करभरणा
- mahaulb.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. ‘आपला मालमत्ता क्रमांक जाणून घ्या’ या पर्यायावर क्लिक करा
- ‘नागरी स्थानिक स्वराज्य संस्था’ यादीतून ‘तळेगाव दाभाडे नगरपरिषद-पुणे’ निवडा.
- गुलाबी रंगाच्या मालमत्ताकर देयकावर नमूद असलेला जुना मिळकत क्रमांक टाका
- ‘शोधा’ या पर्यायावर क्लिक करा
- स्क्रीनवर नवीन मालमत्ता क्रमांक, थकबाकी रक्कम व इतर तपशील दिसेल
- मालमत्तेचा तपशील तपासून ‘रक्कम भरा’ या पर्यायावर क्लिक
- ऑनलाइन व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कराची पावती तत्काळ उपलब्ध होईल
- पावती जतन करून ठेवावी.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT