पिंपरी-चिंचवड

मावळ भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल

CD

तळेगाव दाभाडे, ता. ५ : सलग पराभव, अंतर्गत गटबाजी आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मावळमधील भारतीय जनता पक्ष (भाजप) ने महत्त्वाचा निर्णय घेत पक्षाची सर्वाधिकार असलेली कोअर कमिटी अधिकृतपणे बरखास्त केली आहे. नव्या कोअर कमिटीमध्ये तरुण आणि उर्जावान कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने संघटनेत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
पवनानगर येथे झालेल्या बैठकीस माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, कोअर कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती शेटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संघटनात्मक बदल, आगामी रणनीती आणि पक्षविरोधी कारवायांवर चर्चा करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेला १५-० असा पराभव पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत संघटनात्मक बदलांची मागणी केली होती. पक्षातील निष्ठा आणि कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

‘भाकरी फिरवली’
या पार्श्वभूमीवर कोअर कमिटी बरखास्त करून पक्षाने ‘भाकरी फिरवण्याचा’ निर्णय घेतला. नव्या कोअर कमिटीमध्ये तरुण नेतृत्वाला संधी देत संघटनात्मक पुनर्बांधणीवर भर दिला जाणार आहे. बूथस्तरावरील मजबुती, आधुनिक निवडणूक रणनीती आणि तळागाळातील संवाद वाढविणे यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप असलेल्या कार्यकर्त्यांची नावे वरिष्ठांकडे पाठवण्यात आली असून त्यांच्यावर लवकरच शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT