पिंपरी-चिंचवड

मावळात अमली पदार्थांचा पुन्हा सुळसुळाट

CD

तळेगाव दाभाडे, ता. १० : मावळ तालुक्यात अमली पदार्थांच्या विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोणावळा, वडगाव, कामशेत, तळेगाव शहरांसह ग्रामीण भागातील काही ठिकाणी पानटपऱ्यांवरून अमली पदार्थांची उघड विक्री होत असल्याची चर्चा वाढली आहे. त्यामुळे युवक आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचा धोका वाढत असल्याची गंभीर चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही वर्षांत तालुका अमली पदार्थांच्या व्यवहाराबाबत अत्यंत संवेदनशील बनला आहे. मेफेड्रोनसारख्या अमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि सेवनाचे प्रकार अधूनमधून उघडकीस येत आहेत. यापूर्वी पोलिसांनी कारवाई करून काही आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर काही काळ या प्रकारांना आळा बसला होता. मात्र अलीकडे पुन्हा काही ठिकाणी हे व्यवहार सुरू झाल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे काही पानटपऱ्यांवर पानात अमली पदार्थ मिसळून विक्री होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. लोणावळा शहरात काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी १० ते १२ पानटपऱ्यांवर धाड टाकून तेथील नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्या कारवाईनंतर थोडे दिवस परिस्थिती नियंत्रणात आली असतानाच पुन्हा विक्री वाढल्याची चर्चा आहे.
याचा सर्वाधिक परिणाम युवक आणि शालेय विद्यार्थ्यांवर होत आहे. शाळा आणि महाविद्यालय परिसरात काही युवक पानटपऱ्यांवर गर्दी करत आहेत.
दरम्यान, अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा तालुक्यातील युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या गर्तेत जाण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने पुन्हा विशेष मोहीम राबवून संशयित ठिकाणांवर धाडसत्र सुरू करावे, तसेच पानटपऱ्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी विक्रीवर कडक नजर ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केल्यासच या वाढत्या सुळसुळाटाला आळा बसू शकतो, असे स्थानिकांना वाटते.

नशामुक्तीच्या संकल्पाला केराची टोपली
तत्कालीन पोलिस उप अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान सक्षमपणे राबवून गुन्हेगारांवर अनेक कारवाई केल्या त्याच बरोबर तरुण वर्गाला नशामुक्त करण्याच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी व्याख्याने घेतली. व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना व्यसनमुक्त करून त्यांना आरोग्यदायी जीवन जगता यावे यासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या सहकार्याने काम सुरू केले. कार्तिक यांची बदली झाल्यानंतर मात्र पोलिसांनी या अभियानाला केराची टोपली दाखविल्याची स्थानिकांची खंत आहे.
---
तालुक्यातील सर्व पान टपऱ्या तपासण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. गेल्या तीन महिन्यांत दहा पानटपऱ्यांवर खटले दाखल केले आहेत. ज्या पान टपऱ्यांवर अमली पदार्थ मिळतील त्यावर तत्काळ कारवाई केली जाईल.
- गजानन टोम्पे, पोलिस उपअधिक्षक, लोणावळा विभाग
-----
छायाचित्र
02380

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: इराणने युद्धाचे नियमच बदलले! F-25, F-22 जेट्स अन् शक्तिशाली मिसाईल्सला तोंड देणारं तंत्रज्ञान पहिल्यांदाच जगासमोर

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडर टंचाईचा परिणाम; इंडक्शन शेगड्यांची दुपटी किमतीने विक्री, कोळसा व डिझेल शेगड्यांनाही वाढती मागणी

Pune Fire : शनिवारवाड्याजवळ पालापाचोळ्याला आग; नारायण दरवाजाला आगीची झळ

Pune News : पथारी शुल्कात ७५ टक्के कपात करा; स्थायी समितीपुढे ठराव

Gas Cylinder Shortage : कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा

SCROLL FOR NEXT