तळेगाव दाभाडे, ता. २३ : तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात शहीद दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणारे क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी मुख्याधिकारी गिरीष दापकेकर, गटनेत्या हेमलता खळदे, नगरसेविका सोनाली दरेकर तसेच नगरसेवक आमिर मुलानी यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कल्याणी लाडे, मधुरा जोशी, नेहा पाटील, प्रशांत शिवणे, संदीप सोनवणे, प्रसाद गुरव, सुनील काळकुटे, स्मिता म्हस्के, भास्कर वाघमारे, अनिल इंगळे, संतोष दाभाडे आदींचा समावेश होता.