पिंपरी-चिंचवड

मावळ बाजार समितीच्या नऊ सदस्यांचे राजीनामे

CD

तळेगाव दाभाडे, ता. ६ ः मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतील सभापतिपदाच्या निवडणूक निकालानंतर १८ पैकी ९ सदस्यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात राजीनामे सादर केले.
आता राष्ट्रवादीचे ४ आणि भाजपचे ५ सदस्य असे सदस्य राहिले आहेत. आता ९ सदस्यांवर गणसंख्या पूर्ण होते का, संस्था कार्यरत राहते का, की बरखास्तीची प्रक्रिया सुरू होते, याबाबतचा अंतिम निर्णय सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट घेणार आहेत. त्यामुळे बाजार समिती बरखास्त होणार की तरणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा अनपेक्षित पराभव झाला. त्यानंतर रविवारी वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. याबाबत ‘सकाळ’ने सोमवारी वृत्त दिले होते. सुप्रिया मालपोटे, अंजली जांभुळकर, भरत टकले, अमोल मोकाशी, मारुती वाळुंज, दिलीप ढोरे, विक्रम कलवडे, नथुराम वाघमारे आणि विलास मालपोटे यांनी राजीनामे दिले. बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२ आणि काँग्रेसचा १ असे एकूण १३ सदस्यांचे स्पष्ट बहुमत आहे. तर भाजपचे केवळ ५ सदस्य आहेत. यानंतरही राष्ट्रवादीला ७-११ असा पराभव पत्करावा लागला. पक्षातील सहा मते फुटल्याचे स्पष्ट झाले. या पराभवानंतर आमदार सुनील शेळके यांनी पक्षाच्या सदस्यांना तातडीने राजीनामे सादर करण्याचे आदेश दिले होते.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC Topper from Rural Deglur: देगलूरच्या भूमीतून जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीपर्यंत; रामपूरचे राहुल पांडवे यादगीरचे नवे जिल्हाधिकारी

Farmer House Fire: सांगवी करडखेड येथे शेतकरी सूर्यवंशी बंधूंचे घर भीषण आगीत भस्मसात; लाखोंचे नुकसान

Mahur Yatra : अधिक महिन्यानिमित्त माहूर गडावर श्री रेणुका देवी दर्शनासाठी भाविकांची उसळलेली गर्दी

Latest Marathi News Live Update : धुळे जिल्ह्यातील १८२ पैकी ९ पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा

Rohit Sharma: आता कितीही धावा केल्या तरी..." रोहित शर्माने थेट बोलूनच दाखवलं; भारताला कोणीच थांबवू शकत नाही!

SCROLL FOR NEXT