पिंपरी-चिंचवड

घरगुती गॅस पुरवठ्याचा कामशेतमध्ये खोळंबा

CD

तळेगाव दाभाडे, ता.१६ : कामशेत शहरासह परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा तब्बल ४५ दिवसांनी होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुरवठ्याचा कालावधी ४५ दिवसांवरून २५ दिवसांवर आणावा, तसेच ग्रामीण भागासाठी अतिरिक्त गॅस वितरक नेमावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कामशेतची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या सुमारे १५ हजार होती. मात्र, सध्या ती ३० ते ४० हजारांच्या घरात पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत गॅस सिलिंडर पुरवठ्याची व्यवस्था मात्र जुनीच राहिल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या कामशेत शहर, काले कॉलनी, आंदर मावळ आणि नाणे मावळ या विस्तृत भागासाठी एकच गॅस वितरक सेवा देत आहे. या वाढत्या लोकसंख्येला हा वितरक अपुरा पडत असल्याने ग्रामीण भागात किमान आणखी दोन गॅस वितरक वाढविण्याची मागणीही करण्यात आली आहे. या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाला तातडीच्या सूचना देत गॅस पुरवठा नियमित आणि वेळेत करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कामशेत येथील गॅस वितरक यांच्याकडे जाऊन विक्री, वाटप व बुकींगच्या तक्रारींबाबत पुरवठा अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
- गणेश तळेकर, नायब तहसीलदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचं हेच महागाई नियंत्रणाचं सूत्र, शरद पवारांचा गॅस दरवाढीवरून टोला; शेवटी इशाराही दिला

26/11 वेळी 20 गरोदर महिलांचे प्राण वाचवणारी ती परिचारिका कोण ? कंगनाने साकारलीय भूमिका

Photos : 1000 वर्षे जुनी प्राचीन शिलालेखांची कलाकृती सापडली; काळाच्या ओघात दडलेला 7व्या- 8व्या शतकाचा इतिहास, फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

Mumbai: मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मित्र-मैत्रिणींसोबत मद्यपान केले अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT