तळेगाव दाभाडे, ता. २१ : येथील प्राचीन श्री बनेश्वर महादेव मंदिरात चंदनउटी सोहळ्यानिमित्त ‘मोगरा महोत्सव’ भक्तिभावात उत्साहात पार पडला. महाअभिषेकानंतर सव्वानऊ किलो चंदनाचा लेप लावून मोगरा, गुलाब, झेंडू आदी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली. मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.
या मंदिरात चंदनउटी सोहळ्याचे हे २६वे वर्ष होते. कार्यक्रमासाठी योगी हरिनाथ महाराज, अवघड पीर साबिरनाथ, महंत भैरवनाथ आदी उपस्थित होते. सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत सोहळा पार पडला. सायंकाळी महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रात्री एकतारी भजनाचा कार्यक्रम रंगला.
या वेळी कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल मारुती भेगडे व महिपती लांडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुमारे पाच हजार भाविकांनी दर्शन घेतले. बनेश्वर सेवा मित्र मंडळ व नगरसेवक संतोष भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्रीमंत सरदार अंजलीराजे दाभाडे सरकार, श्रीमंत सरदार चंद्रसेनराजे दाभाडे सरकार, श्रीमंत सरकार सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे सरकार, श्रीमंत सरदार याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार, श्रीमंत सरदार दिव्यलेखाराजे दाभाडे सरकार, बबनराव भेगडे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, उपनगराध्यक्ष गणेश काकडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.