पिंपरी-चिंचवड

तळेगाव नगर परिषदेकडून मोफत कनिष्ठ महाविद्यालयाची घोषणा

CD

तळेगाव दाभाडे, ता. १३ ः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि शिक्षण मंडळातर्फे आगामी शैक्षणिक वर्षापासून कला व वाणिज्य शाखांचे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाखेसाठी ८० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शिक्षण समिती सभापती भारती धोत्रे, प्रभारी प्राचार्य वर्षा थोरात तसेच शिक्षण समिती सदस्य सोनाली दरेकर, ऋतुजा भगत आदी उपस्थित होते. शासनाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक २ येथे विशेष मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
महाविद्यालयासाठी क्रीडा संकुलामध्ये तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात आली असून पुढील दोन वर्षांत स्वतंत्र इमारतीचा आराखडा पूर्ण करण्याचा मानस नगर परिषदेकडून व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी चालू अर्थसंकल्पात २७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून सीएसआर निधीतून विविध कंपन्या व स्वयंसेवी संस्थांची मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नगराध्यक्ष दाभाडे यांनी सांगितले.

महाविद्यालयासाठी क्रीडा संकुलात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगामी दोन वर्षांत स्वतंत्र इमारतीचा आराखडा पूर्ण करण्यात येईल. यंदाच्या अर्थसंकल्पात २७ लाख रुपयांची तरतूद केली असून सीएसआर निधीतून विविध कंपन्या व स्वयंसेवी संस्थांची मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- संतोष दाभाडे, नगराध्यक्ष

नगर परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत क्रीडा, कला आणि स्पोकन इंग्लिश क्षेत्रातही उल्लेखनीय यश मिळवले आहे. उच्च शिक्षित शिक्षक, अत्याधुनिक प्रयोगशाळा, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय साहित्य आणि सकस आहार यामुळे १७०० विद्यार्थ्यांचे भविष्य घडत आहे. आता कनिष्ठ महाविद्यालयामुळे १६० विद्यार्थ्यांना व पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- भारती धोत्रे, सभापती, शिक्षण समिती

नगर परिषद महाविद्यालयामुळे आर्थिक अडचणींमुळे उच्च माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना आधार मिळणार आहे. सर्वांना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार असल्याने पालकांनी नगर परिषद महाविद्यालयाला प्राधान्य द्यावे.
- वर्षा थोरात, प्रभारी प्राचार्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT