तळेगाव दाभाडे, ता.१४ : शाळेतील शिक्षकांकडून घेतल्या जाणाऱ्या खासगी शिकवणी वर्गांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी तळेगाव शहर युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी विशाल वाळुंज, तालुका सरचिटणीस राजीव फलके, संपर्क प्रमुख राजू शिंदे, मावळ तालुका सरचिटणीस किरण मोकाशी, स्वप्निल निकाळजे, सिराज खान, सिद्धांत वाळुंज, संगमेश पाटील, नितीन माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र कर्मचारी सेवा नियमांतील कलम २२ नुसार शाळेतील शिक्षकांनी व्यावसायिक स्वरूपात खासगी शिकवणी घेणे नियमबाह्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरी देखील काही ठिकाणी असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.