पिंपरी-चिंचवड

शिवकालीन युद्धकला शिकण्याची संधी

CD

तळेगाव दाभाडे, ता. १५ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सरसेनापती खंडेराव दाभाडे सरकार व उमाबाईसाहेब दाभाडे सरकार यांच्या भूमीत शिवकालीन युद्धकला उन्हाळी प्रशिक्षण शिबिर २०२६ चे आयोजन करण्यात आले. पुढील दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात मोठ्या संख्येने लहान मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे सरकार यांची मानाची तलवार दर्शन व पूजनासाठी उपलब्ध करण्यात आली होती. यावेळी इतिहास अभ्यासक डॉ. प्रमोद बोऱ्हाडे यांनी संभाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत व्याख्यानरूपी सेवा दिली. शस्त्र प्रशिक्षक किरण अडागळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शस्त्रांचे महत्त्व आणि युद्धकलेची माहिती दिली.
या प्रसंगी श्रीमंत सरदार सत्यशिलराजे दाभाडे, नगरसेविका शोभाताई परदेशी, स्नेहा खांडगे, अश्विनी शेळके, सोनाली दरेकर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या महिला मंचाच्या नेहा गराडे, शीतल काकडे, अर्चना दाभाडे, निकिता रगडे, योगेश नाहटा, सचिन शेडगे, कुंदन भोसले, विनय दाभाडे, सर्जेस पाटील, नीलेश गराडे उपस्थित होते.
शिबिराचे संयोजन सह्याद्री प्रतिष्ठान मावळ, शिवसह्याद्री शिवस्पर्श प्रतिष्ठान मावळ, शिवशाही परिवार मावळ, सरसेनापती उमाबाई दाभाडे महिला मंच तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या वतीने करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT