पिंपरी-चिंचवड

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती गर्दी

CD

तळेगाव दाभाडे, ता.१९ : एकीकडे मावळ परिसरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून वाढत्या शुल्कामुळे पालक त्रस्त असताना नगरपरिषदेच्या मोफत शिक्षण उपक्रमामुळे माध्यमिक विद्यालय क्र.२ मध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक २ येथे यावर्षीपासून अकरावी कला व वाणिज्य शाखेला मान्यता मिळाली असून विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. मराठी माध्यमाच्या कला व वाणिज्य शाखांमध्ये प्रत्येकी ८० विद्यार्थ्यांची क्षमता ठेवण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरत आहे. विशेषतः मुलींचा प्रवेशासाठी वाढता प्रतिसाद लक्षवेधी ठरत असून शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जाण्यापासून नगरपालिकेने वाचविल्याची भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली.
प्रभारी मुख्याध्यापिका वर्षा थोरात म्हणाल्या,‘‘ केवळ तळेगाव शहरातूनच नव्हे तर नाणे, शिरगाव, साते, खालुंब्रे, दारुंब्रे, आढे, परंदवाडी, इंदोरी, करंजगाव आणि कामशेत परिसरातूनही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला पसंती दर्शवली असून प्रवेश नोंदणी अद्यापही सुरू आहे.’’
या उपक्रमासाठी नगराध्यक्ष संतोष दाभाडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर तसेच शिक्षण समितीच्या सभापती भारती धोत्रे आणि सर्व नगरसेवकांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. या विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासोबत संगणक शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुसज्ज ग्रंथालयाची सुविधाही नगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT