पिंपरी-चिंचवड

पवना धरणातून आता सिंचनासाठी उपसा बंद

CD

तळेगाव दाभाडे, ता. २२ : पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरल्याने येत्या ३१ ऑगस्टपर्यंत केवळ पिण्याच्या पाण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. सिंचनासाठी होणारा पाणी उपसा बंद करण्याचा आदेश पाटबंधारे विभागाने जारी केला.
सध्या धरणात केवळ १८.५० टक्के पाणीसाठा आहे. यात उपयुक्त पाणीसाठा १.६७ टीएमसी इतकाच शिल्लक आहे. खडकवासला पाटबंधारे विभागांतर्गत पवना धरण प्रकल्पाच्या वतीने सूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार संभाव्य पाणीटंचाई आणि ‘एल-निनो’च्या परिस्थितीचा विचार करून शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आवश्यक पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.
नागरिक, शेतकरी, लाभधारक, व्यावसायिक तसेच मिळकतधारकांनी पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक गरजांसाठी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा जपून व नियोजनबद्ध वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जलसंपदा विभागाच्या १३ जूनच्या शासन पत्रानुसार धरण परिसरात सिंचनासाठी होणारा पाणी उपसा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच धरण, नदी, कालवे, तलाव व अन्य जलस्रोतांमधून कोणत्याही प्रकारचा अनधिकृत किंवा बेकायदेशीर उपसा तत्काळ थांबविण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय, शासन निर्णय १२ डिसेंबर २०१८ नुसार बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पाटबंधारे विभागाने दिला.
‘पाणी वाचवा-भविष्य वाचवा’ असा संदेश देत पाटबंधारे विभागाने नागरिकांना पाणी बचतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सध्या धरणातील उपलब्ध साठा आणि पावसाची अनिश्चितता लक्षात घेता आगामी काळात पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
-----
पवना धरणातून बेकायदेशीरपणे पाणी उपसा करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर योग्य करावा.
- रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण
----
फोटो
29014

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात थेट २० टक्के वाढ; पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय

मोदींच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, शिंदेसेनेला मिळणार आणखी दोन मंत्रीपद? या बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवणार!

कोचिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल, अनेक विद्यार्थी अडकले, जीव वाचवण्यासाठी धडपड

Eastern Freeway: एमएमआरडीएच्या विस्तारीकरण प्रकल्पात बदल, ९४९ झाडे वाचणार; प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या ६ फुटीर खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT