पिंपरी-चिंचवड

जात प्रमाणपत्र अवैध; तळेगावच्या नगरसेवकाचे पद रद्द

CD

तळेगाव दाभाडे, ता. ६ : जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक मजनू हनुमंत नाटेकर यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा आदेश दिला.

तळेगाव दाभाडे येथील प्रभाग १०-अ मधून निवडून आलेल्या नाटेकर यांचे जात प्रमाणपत्र पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. या निर्णयाच्या आधारे महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ मधील कलम १६(१-क)(ब) नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. समितीचा निर्णय लागू झाल्याच्या दिनांकापासूनच नाटेकर यांचे सदस्यत्व संपुष्टात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
या आदेशाची प्रत तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, राज्य निवडणूक आयोग आणि नगरविकास विभागाला पाठवण्यात आली आहे. दरम्यान, ‘‘जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मिळाला असून संबंधित जागा रिक्त झाली आहे,’’ असे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली पीडीपी कार्यालयाबाहेर शांततापूर्ण कँडललाइट निदर्शने

INDIA VS PAKISTAN : तारीख नोट करून घ्या! सप्टेंबरमध्ये भारत-पाकिस्तान समोरासमोर... क्रिकेटचा हा महामुकाबला कुठे होणार?

Liquor Flavour Row: फ्लेवर वाद चिघळला! FSSAI च्या नोटिसांना दारू कंपन्यांचे हायकोर्टात आव्हान; नियमांवरून नवा संघर्ष

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

SCROLL FOR NEXT