तळेगाव स्टेशन/तळेगाव दाभाडे, ता. ८ : वराळे गावात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरमधून अवैध रिफिलिंग करून विकणाऱ्या टोळीचा तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली. दहा व्यावसायिक व १३६ घरगुती अशी एकूण १४६ सिलिंडर, एका टेम्पोसह पोलिसांनी १५ लाख ५२ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनंत रावण यांनी फिर्याद दिली. मदन भिकमसिंग ठाकूर (वय ३५), देवेंद्र हरीओम ठाकूर (२६), सुनील प्रकाश इंगळे (३०), सुनील मल्लिकार्जुन पुजारी (२८), सूरज उमाकांत मासाळे (२२), रमेश व्यंकट रेड्डी (३९) आणि अशोक मेहराजराम कुमार (३८) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय न्यायसंहितेसह जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एका दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. कुणाल भारत गॅस एजन्सीच्या गोदामासमोर गॅस वितरण वाहनांमध्येच अवैध रिफिलिंग सुरू होते. याबाबत माहिती मिळताच पोलिस पथकाने शुक्रवारी दुपारी छापा टाकला. गॅस वितरणाच्या पाच टेम्पोमध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याचे परिसरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल याची कल्पना असूनही आरोपी अवैध गॅस रिफिलिंग करीत होते.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.