पिंपरी-चिंचवड

कचऱ्याचे ढीग अन् दुर्गंधीचा कहर; कामशेतकर त्रस्त!

CD

तळेगाव दाभाडे, ता. ९ : कामशेत शहरात रस्त्यांच्या कडेला, बाजारपेठेत आणि वसाहतींमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसामुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास आणि माशांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तिन्ही मावळातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून कामशेतची ओळख आहे. दररोज हजारो नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच विद्यार्थी या परिसरातून ये-जा करतात. मात्र, मुख्य बाजारपेठ, कामशेत-पवनानगर रस्ता, इंद्रायणी नदी परिसर, देवराम दत्त कॉलनीसह विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पावसाचे पाणी आणि कचरा एकत्र झाल्याने रस्त्यांच्या कडेला चिखल झाला असून, दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
विशेष म्हणजे, कामशेत ग्रामपंचायतीकडे कचरा संकलनासाठी दोन पिकअप वाहने, तीन ट्रॅक्टर आणि सुमारे २० कर्मचारी आहेत. कचरा टाकण्यासाठी दरमहा ६५ हजार रुपये भाड्याची जागाही उपलब्ध आहे. या संपूर्ण स्वच्छता व्यवस्थेवर दरमहा सुमारे पाच लाख रुपये खर्च होत असल्याचे सांगण्यात येते. एवढा खर्च करूनही शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
‘कचरा उचलण्यासाठी वाहने आणि कर्मचारी असताना शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग का साचत आहेत?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यात कचरा साचल्याने दुर्गंधीबरोबरच डास आणि माशांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘‘काहीजण बाहेरून टेम्पोद्वारे कचरा आणून शहरातील रस्त्यांच्या कडेला टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- धनाजी देशमुख, ग्रामविकास अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT