तळेगाव दाभाडे, ता. २६ : विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, तसेच त्यांच्यात संस्कार, सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत, यासाठी तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी, एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
आजच्या काळात पालकांनी आपल्या पाल्यांशी संवाद साधणे आणि त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून अभ्यास, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीकडे वळविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी सांगितले.
या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती सुदाम शेळके, नगरसेविका अनिता पवार, आशा भेगडे, संगीता खळदे, शैलजा काळोखे, प्रशासन अधिकारी अनिता वैद्य, ‘एक घास फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. शिवराज पाटील, मोनिका पाटील तसेच शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
शहरातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि अभ्यासाचे नियोजन उपलब्ध करून दिले जाणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे खासगी प्रशिक्षण घेणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा विशेष लाभ होणार आहे.
विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी आणि भविष्यातील संधींसाठी त्यांची तयारी व्हावी, यासाठी शाळांच्या माध्यमातूनही आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेऊन भविष्यासाठी योग्य दिशा निश्चित करावी, असे आवाहन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.