पिंपरी-चिंचवड

मावळातील ५९ ग्रामपंचायतींवर प्रशासक

CD

तळेगाव दाभाडे, ता. १२ ः मावळ तालुक्यातील मुदत संपलेल्या तब्बल ५९ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी नऊ सप्टेंबर रोजी याबाबत आदेश काढला. शासनाच्या आठ सप्टेंबरच्या राजपत्रातील निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
मावळातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी २०२६ मध्ये संपली होती. मात्र, प्रशासकीय अडचणींमुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने संबंधित ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांकडे सोपविण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किंवा सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत प्रशासक कार्यरत राहणार आहेत.

या ग्रामपंचायतींवर प्रशासक
करंजगाव, धामणे, वारू, टाकवे बु., शिवणे-सडवली, येलघोल, चिखलसे, नाणे, सांगवडे, कुसगाव बु., पाटण, परंदवडी, वेहेरगाव, मळवंडी ठुले, कोथुर्णे, आंबेगाव, आढले खु., शिवली, सोमाटणे, माळवाडी, येळसे, मोरवे, थुगाव, अजिवली, तिकोणा, घोणशेत, कुसवली, डाहुली, साते, गोवित्री, शिरदे, कांब्रे, आंबी, दारुब्रे, खांडशी, मळवली, गहुंजे, इंगळून, उर्से, पुसाने, करुंज, नवलाख उंब्रे, महागाव, वडेश्वर, साई, खांडी, कुसगाव प.मा., पाचाणे, खडकाळे, आपटी, बऊर, ताजे, कुसगाव खु., कार्ला, कशाळ, कुरवंडे, माळेगाव बु,आढे, उकसाण या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.

विस्तार अधिकाऱ्यांकडे जबाबदारी
प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (कृषी) आणि विस्तार अधिकारी (सांख्यिकी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार अरुण सोळंके, सुदाम वाळुंज, संदीप काळे, बाळासाहेब मतकर, शुभांगी भूमकर, अपूर्वा पाटील, वासंती बोराटे आणि अनिता ससाणे यांच्याकडे विविध ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्त प्रशासकांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९, त्याखालील नियम, शासन आदेश तसेच जिल्हा परिषद प्रशासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतींचे कामकाज पाहावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

निवडणुकीची प्रतीक्षा
मावळातील तब्बल ५९ ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांकडे गेल्याने आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतींचा कारभार सोपविला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Noida Owl Terror: कुत्रे-माकडांनंतर आता घुबडांची दहशत; थेट डोक्यावर झडप, शहरातील नागरिकांमध्ये पसरली आहे भीती

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT