पिंपरी-चिंचवड

दिवाळीत केरसुणी विक्रीतून संसाराला हातभार

CD

तळेगाव दाभाडे, ता. ४ : दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी तिचे प्रतीक मानून केरसुणीला पूजन करण्याची परंपरा आहे. याच परंपरेच्या माध्यमातून चिखलसे येथील अलकाबाई ज्ञानेश्वर तुपे गेल्या तीस वर्षांपासून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत आहेत. कामशेत बाजारपेठेत त्या केरसुणी विक्री करत आहेत.
वर्षभरातील इतर कामांबरोबरच दिवाळीचा सण जवळ आला, की अलकाबाईंची केरसुणी विक्रीची तयारी सुरू होते. गावोगावातून केरसुणी उपलब्ध करून त्या कामशेत बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. दिवसभर बाजारपेठेत बसून ग्राहकांना केरसुणी विकायची आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांतून दिवाळीची खरेदी करायची, असा त्यांचा दरवर्षीचा शिरस्ता आहे.
काळ बदलला तसा केरसुणीच्या किमतीतही मोठा बदल झाला आहे. तीस वर्षांपूर्वी अवघ्या दीड ते दोन रुपयांना मिळणारी केरसुणी आता साठ रुपयांना विकली जाते. बाजारपेठेतील स्पर्धा, बदलती जीवनशैली आणि वाढत्या महागाईच्या काळातही त्यांनी हा पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवला आहे. या तीस वर्षांत अनेक चढ-उतार आले; मात्र त्यांनी मेहनतीची कास सोडली नाही. दिवाळीच्या बाजारपेठेत त्यांची उपस्थिती आता या व्यवसायाचा अविभाज्य भाग बनली आहे.

दिवाळीत लक्ष्मीपूजनाला आम्ही लक्ष्मी अर्थात केरसुणीचे पूजन करतो. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. गावोगावी महिला केरसुणी विक्रीसाठी बाजारपेठेत येतात. आम्हीही आज कामशेत बाजारपेठेतून खरेदीसाठी आलो आहोत.
- तान्हुबाई शिवराम बगाड, ग्राहक, कामेशत

दिवाळीत प्रत्येक घरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. मात्र, हा आनंद साजरा करण्यासाठी अनेक हात दिवसरात्र कष्ट करत असतात. या किरकोळ वस्तू विक्रेत्यांना याच कष्टातून दिवाळीचा आनंद मिळतो.
- विमल देवजी बगाड, ग्राहक, कामशेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये 'इतक्या' मुस्लिम उमेदवारांनी मारली बाजी; एकाने तर इतिहासच रचला, काय असेल पुढील आव्हान?

IND vs NZ, 1st ODI: आधी अर्शदीपचा तिखट मारा अन् मग विराट कोहलीची वादळी फिफ्टी! भारताची विजयासह वनडे मालिकेची दणक्यात सुरुवात

ना वडिलांचं नाव, ना आडनाव! तब्बू फक्त 'तब्बू' नाव का लावते? हे आहे कारण

अतुल परचुरे यांचा शेवटचा चित्रपट पाहिलात का? 'अंत एक प्रारंभ'चा ट्रेलर प्रदर्शित; प्रीमियरची तारीखही ठरली

Latest Marathi News Live Update : थकीत वाहतूक चलनावर २० टक्क्यांपर्यंत सवलत; महाराष्ट्रात अभय योजना

SCROLL FOR NEXT