पिंपरी-चिंचवड

तालुकास्तरीय किल्ले बनविणे स्पर्धेत कुसगाव बुद्रूक प्रथम

CD

टाकवे बुद्रूक, ता. ३० : जिल्हाधिकारी पुणे यांचे आदेशान्वये जिल्ह्यातील शिवकालीन ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने ‘किल्ले बनविणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, तालुकास्तरीय स्पर्धेत मावळ तालुक्यातील बहुसंख्य शाळा आणि गावांनी सहभाग घेऊन ऐतिहासिक वारसा प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला. त्यात कुसगाव बुद्रूक येथील शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला तर दुसरा क्रमांक कान्हे येथील शाळेने पटकावला. कुसगाव बुद्रूक येथील शाळेने हुबेहूब किल्ले राजगडाची प्रतिकृती साकारली होती. तर कान्हे शाळेने शिवरायांची जन्मभूमी असलेल्या ‘किल्ले शिवनेरी’ची प्रतिकृती निर्माण केली होती.

कुसगाव बुद्रूक येथील शाळा तसेच गावातील तरुण हे ऐतिहासिक वारसा जतन करण्याबाबत इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी दरवर्षी किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवत आहेत. गडसंवर्धन करत आहेत. तर शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांवर सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. दोन्हीही गावांनी व शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

किल्ले प्रदर्शनाबरोबर ऐतिहासिक देखावा
कुसगाव बुद्रूक येथील शाळेने किल्ले राजगडसोबत जुनी नाणी-नोटा, ऐतिहासिक पुस्तके, ऐतिहासिक हत्यारे, तोफगोळे व इतर गोष्टींचेही प्रदर्शन ठेवले होते. तर कान्हे येथील शाळेने शिवकालीन खेळ, कलाकुसर, भांडी, नाणी-नोटा, हत्यारे यांचे प्रदर्शन गावपातळीवर घेतलेले साहित्य यांचा समावेश केला. शालेय ग्रंथालयात असलेली ऐतिहासिक पुस्तके सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रदर्शित केली होती.

किल्ले पाहण्यासाठी मान्यवरांची उपस्थिती
कुसगाव बुद्रूक जिल्हा परिषद शाळा व श्री भैरवनाथ तरुण मंडळ यांनी साकारलेल्या किल्ले राजगड या किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषद पुणे मुख्याधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी मावळ- मुळशी सुरेंद्र नवले, तहसीलदार मावळ विक्रम देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक, लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साबळे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटविकास अधिकारी के. के. प्रधान, महिला व बालकल्याण अधिकारी विशाल कोटवडे, इतिहास तज्ज्ञ प्रमोद बोराडे, शिक्षण विभाग अधिकारी सुदाम वाळुंज, विस्तार अधिकारी शोभा वहिले, मुकुंद तनपुरे, अमोल चव्हाण यांनी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT