bhimashankar sanctuary
esakal
खरीप हंगाम संपून रब्बीच्या पेरण्या झाल्या की थंडीच्या दिवसांत मावळातील नागरिकांचा एक समूह गेल्या काही वर्षांपासून सह्याद्रीतून मार्गक्रमण करत भीमाशंकर येथील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी पायी यात्रा करत आहे. कधी नाणे मावळ भागातून तर कधी आंदर मावळ भागातून या दोन दिवसांची यात्रा होत आहे.
मावळातील काही नागरिकांकडून गेल्या आठ वर्षांपासून सरत्या वर्षाच्या अखेरीस डिसेंबर महिन्यात पहाटे तयार होऊन भीमाशंकर येथील महादेव मंदिरात पोहचण्याची तयारी केली करतात. नाणे मावळातून, आंदर मावळातील माळेगाव गाव बुद्रुक येथील वरसूबाई देवीचे दर्शन घेऊन डोंगरभागातून पायी प्रवास केला जातो. मावळातील अनेक गावातील तरुण हे या यात्रेत सहभागी असतात. घनदाट जंगलातून ६५ किलोमीटर पायी प्रवास करत ते आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभव पार पाडतात.
मावळातील अनेक तरुण व ज्येष्ठ नागरिक पायी यात्रा करून महादेवाचे दर्शन घेतात. दिवसभर त्यांचा जंगलातील प्रवास असतो. सकाळी साडेपाचला जंगल न्याहाळत, निसर्ग पाहण्याचा आनंद घेतात. सातपर्यंत मंदिरापर्यंत पोहोचतात. प्रवासादरम्यान निसर्गाची उधळण त्यांना पाहावयास मिळत असते. पक्षांचा किलबिलाट जणू त्यांचे स्वागत करत असते, असा त्यांना भास होत असतो. जाताना चपात्या व शेंगदाण्याची चटणी सोबत नेऊन निसर्गाच्या रम्य वातावरणात रमतगमत न्याहारी करण्याचा आनंद ते घेतात.
भीमाशंकर हे खेड तालुक्यातील महादेव शंकराचे प्राचीन मंदिर तसेच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक. निसर्गाने मुक्त उधळून करून या परिसराला सजवले आहे. प्रचंड गर्द झाडीत व उंच डोंगराच्या कुशीत, सह्याद्रीच्या पर्वतरांगेत हे मंदिर वसले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी व श्रावणी सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. तसेच सोमवती अमावस्येलाही भाविक येथे हजेरी लावून दर्शन घेत असतात. सोमवती अमावस्येला महादेव शंकराची पूजा करणे, दर्शन घेणे तसेच उपासना करणे लाभदायक असते, असे मानले जात असल्याने मावळातील भाविक मोठ्या आनंदाने मावळ ते भीमाशंकर पायी ६०-६५ किलोमीटरचे जंगलमार्गी अंतर कापून महादेव शंकराच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.