टाकवे बुद्रुक, ता. २४ : ‘जलजीवन मिशन’ योजने अंतर्गत टाकवे बुद्रुक नळपाणी पुरवठा योजनेतून पाण्याची टाकी बांधून जलवाहिनी टाकण्यात आली. त्याचे लोकार्पण नुकतेच झाले आहे. त्यामुळे गावाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. टाकवे बुद्रुक पाणी योजनेसाठी सुमारे दोन कोटी ८७ लाख रुपयांचा निधी शासनाकडून आला होता. त्यातून एक लाख लिटर क्षमतेची टाकी बांधून जलवाहिनी टाकण्यात आली आहे.
या योजनेच्या लोकार्पणप्रसंगी कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे, पंचायत समिती सदस्य देवा गायकवाड, सरपंच संध्या असवले, उपसरपंच ज्योती आंबेकर, माजी सरपंच भूषण असवले आदी उपस्थित होते.
संध्या असवले म्हणाल्या, ‘‘पाण्याची समस्या सुटल्यानंतर आता गावातील कचऱ्याची समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी काम सुरू आहे.’’