पिंपरी-चिंचवड

आम्हाला विश्वासात घेऊनच पाण्याबाबत निर्णय घ्या

CD

टाकवे बुद्रुक, ता.१२ : ठोकळवाडी धरणातील पाण्यावर स्थानिक धरणग्रस्त शेतकऱ्यांचा हक्क आहे. प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय पाणी अन्यत्र वळविण्याचा निर्णय घेऊ नये. विश्वासात घेऊनच पाण्याबाबत निर्णय व्हावा तसेच मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन ठोकळवाडी धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आले.
ठोकळवाडी धरणातून पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्याच्या नियोजित प्रस्तावाला ठोकळवाडी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी कृती समितीच्या बैठकीत विरोध दर्शविला. घाटेवाडी येथे मावळ पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव सुपे आणि जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, नारायणराव ठाकर, शांताराम बापू लष्करी, नामदेव शेलार, भरत जोरी, विठ्ठल वाडेकर आदी उपस्थित होते.
शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून धरणग्रस्तांना आंदोलने करावी लागली. ज्या शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने आपल्या जमिनी दिल्या. त्यांनाच पाण्यासाठी संघर्ष करावा लागणे ही वस्तुस्थिती बैठकीत मांडण्यात आली. कान्हे फाटा-वडेश्वर रस्त्यावरील खासगी कंपनीची मालकी काढून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठीही सरकार दरबारी अनेक वर्षे पाठपुरावा करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. धरणग्रस्तांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणि विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता झालेली नसताना ठोकळवाडी धरणातील पाणी पिंपरी चिंचवड शहराला देण्याचा प्रस्ताव अन्यायकारक असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. यावेळी नव्याने ठोकळवाडी धरणग्रस्त शेतकरी कृती समितीची रचना करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal Death Threat: अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने मागितली ७ कोटींची खंडणी

IPL Trade Records: हार्दिक पांड्या-अर्शदीप सिंग यांच्या ट्रेडने इतिहास घडवला; आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा ट्रेड ठरला...

मुंबई विमानतळाची आंतरराष्ट्रीय सेवा कायम! ११ कंपन्यांची उड्डाणे नवी मुंबईतून, नवे टर्मिनल उभारणार; प्रशासनाचा मास्टर प्लॅन

Smartphone Settings: तुमचा स्मार्टफोन तुमच्यावर नजर ठेवतोय? लोकेशन ट्रॅकिंग रोखण्यासाठी करा या सेटिंग्स बंद!

Latest Marathi News Live Update : दुष्काळी यादीत वंचित तालुक्यांचा समावेश करा, अन्यथा तीव्र आंदोलन : आमदार सतेज पाटील

SCROLL FOR NEXT