पिंपरी-चिंचवड

श्री बनेश्वराला तब्बल पाच किलो चंदनाची उटी

CD

तळेगाव स्टेशन, ता.११ : गेल्या दोन तपांची परंपरा कायम राखत अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय मुहूर्तावर शुक्रवारी (ता.१०) तळेगाव दाभाडे शहरातील ऐतिहासिक श्री बनेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीला भक्तिभावाने पाच किलो चंदनाचा लेप लावून चंदन उटी सोहळा साजरा करण्यात आला. गाभाऱ्यासह मंदिराची विविध फुलांनी आकर्षक सजावटही करण्यात आली.
सालाबादप्रमाणे बनेश्वर सेवा मित्र मंडळ आणि नगरसेवक संतोषभाऊ भेगडे मित्र परिवाराच्यावतीने हा चंदन उटी सोहळा आणि मोगरा महोत्सव भरविण्यात आला. विविध प्रकारच्या १०० किलो फुलांनी बनेश्वर मंदिरासह गाभाऱ्याची आकर्षक सजावट करण्यात आली. सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चंदन उटी सोहळा झाला. रात्री साडेसात वाजता महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री आठनंतर स्थानिक भजनी मंडळांचा एकतारी भजनाचा कार्यक्रम झाला.
माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, चंद्रसेनराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, पीएमआरडीए सदस्य संतोष भेगडे, आशिष खांडगे, शैलजा काळोखे, मनीषा रघुवंशी, अबोली ढोरे, डी.आर.कदम आणि परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बनेश्वर सेवा मंडळ आणि नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT