पिंपरी-चिंचवड

इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश

CD

तळेगाव स्टेशन, ता.२१ : इंद्रायणी महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेच्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत कला, वाणिज्य, विज्ञान व तंत्रशिक्षण शाखांच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत गुण संपादन केले आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आलेल्या बारावीच्या परीक्षेत इंद्रायणी महाविद्यालयातील मुलींनी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९८.०७ टक्के तर वाणिज्य शाखेचा ८९.२२ टक्के तर कला शाखेचा निकाल ७३.२५ टक्के लागला. तंत्रशिक्षण विभागाचा निकाल हा ९२.५० टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेच्या दिव्या संदीप भेगडे या विद्यार्थिनीने रसायनशास्त्र विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त करून सरासरी ९५.१७ टक्के इतके गुण मिळविले. वाणिज्य शाखेतून सार्थक रोहिदास पडवळ या विद्यार्थ्यांने ८९.०० टक्के गुण मिळविले. कला शाखेतून वैष्णवी साहेबराव मराठे हीने ७५.३३ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. तंत्रशिक्षण विभागातून सानिया मेहबूब शेख हिने ७४.०० टक्के गुण प्राप्त करून यश संपादन केले.
इंद्रायणी महाविद्यालयाचा शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे ः दिव्या संदीप भेगडे (९५.१७), अमोघ महेश यादव (९०.००), अजय संजय बोरसे (९०.००), अनुज संतोष भसे (८९.८३)

वाणिज्य शाखा ः सार्थक रोहिदास पडवळ (८९.००), प्रशांत दिलीप गुंजाळ (८५.१७), रिया आनंद कांबळे (८५.००).

कला शाखा ः वैष्णवी साहेबराव मराठे (७५.३३), नसरीन युसूफ अली (७५.१७), रेश्मा पांडुरंग खरमारे (७४.५०)

तंत्रशिक्षण विभाग ः सानिया मेहबूब शेख (७४.००), दिनेश मोतीराम राठोड (६९.३३), मयूरी चंद्रकांत भांगरे (६८.३३)

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षकांनी यशप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

तळेगाव दाभाडे ः इंद्रायणी महाविद्यालयाचे यशप्राप्त विद्यार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT