पिंपरी-चिंचवड

उद्योगपती रतन टाटा यांना मावळवासीयांची श्रद्धांजली

CD

तळेगाव स्टेशन, ता. २२ : उद्योगपती रतन नवल टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय कृतज्ञता सभेचे टाटा मोटर्स मित्र परिवाराच्या वतीने रविवारी राम मनोहर लोहिया सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
श्रद्धांजली सभेस उपस्थित टाटा मोटर्सच्या मावळ आणि पिंपरी-चिंचवड प्रकल्पामध्ये काम करणारे आजी-माजी अधिकारी, कर्मचारी आणि टाटा मोटर्स कामगार संघटनांचे पदाधिकारी यांनी देवमाणूस हरपल्याची भावना व्यक्त केली. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, रवींद्र भेगडे, सुभाष हुलावळे, सतीश ढमाले, संजय असवले, सुरेश रानवडे, विशाल मुऱ्हे, जिगर जानी, शिवाजीराव वाळुंज, सचिन भांडवलकर, प्रवीण खोल्लम, विश्वास देशपांडे आदींनी प्रातिनिधिक स्वरूपात रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. महिला प्रतिनिधी म्हणून शुभांगी शिरसाट, सीमा कदम यांनी श्रद्धांजली वाहिली. टाटा मोटर्सचे कर्मचारी दत्तात्रेय मेढी आणि गणेश यादव यांनी टाटा यांना काव्य सुमनांजली अर्पण केली. टाटा मोटर्स कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष यशवंत काळे यांच्या अध्यक्षीय भाषण आणि शेवटी अशोक काळोखे यांनी म्हटलेल्या पसायदानाने श्रद्धांजली सभेचा समारोप झाला. मावळ तालुक्यातील खंडाळा ते देहूरोड परिसरातील आजी माजी कर्मचारी कामगार मोठ्या संख्येने श्रद्धांजली सभेस उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत मेढी यांनी केले. टाटा मोटर्स सहकारी पतपेढीचे उपाध्यक्ष सचिन टेकवडे, मुन्ना मोरे, विराज शिरोडकर, वेदांत काळे, संतोष बोराडे आणि सहकाऱ्यांनी नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT