तळेगाव स्टेशन, ता. १० : तळेगाव दाभाडे नगर परिषद, महाशक्ती शहर स्तर संघाच्या वतीने महिलांसाठी नेतृत्व विकास प्रशिक्षण आणि मेक-अप संबंधित कौशल्ये विकसन कार्यशाळेचे आयोजन बुधवारी करण्यात आले.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर व प्रशासकीय अधिकारी कल्याणी लाडे यांच्यासह बांधकाम व्यावसायिका सीमा कांचन आणि मेक-अप आर्टिस्ट बोली मांडवकर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सीमा कांचन म्हणाल्या, ‘‘प्रत्येक महिलांमध्ये नेतृत्व करण्याची कला असते. त्यासोबत आत्मविश्वास, संवादकौशल्य, सकारात्मक हे गुण गरजेचे आहेत.’’ उपमुख्याधिकारी श्रीमती ममता राठोड यांनी महिलांना विविध प्रशिक्षण संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यानंतर अबोली मांडवकर यांनी मेक-अपची विविध प्रात्यक्षिके दाखवत मार्गदर्शन केले. संस्थेच्या उपाध्यक्ष प्रतिभा घोडके यांनी सूत्रसंचालन केले. दया लायगुडे यांनी आभार मानले. नगर परिषद शहर अभियान व्यवस्थापक विभा वाणी यांच्या नेतृत्वाखाली राजश्री कुलकर्णी, करुणा सरोदे, सुविधा बशेटी, निर्मला पोटे, मंगल घोडके, संध्या चव्हाण, रत्ना अहिरे, स्नेहल जगताप, जयश्री बाठे, मयुरी आडोळे, अर्चना सोनवणे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.