तळेगाव दाभाडे, ता. १७ ः ‘उत्पादनावर प्रक्रिया करून प्रत्येक वस्तू देशातच बनविण्यावर भर दिला पाहिजे,’ असे प्रतिपादन रॅपिड सात आस्थापनाचे भारतातील प्रमुख व्यवस्थापक (इंडिया कंट्री मॅनेजर) प्रसिद्ध उद्योजक स्वामिनाथन यांनी केले. तळेगावमध्ये विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिनी भारतमातेचा जयघोष करण्यात आला.
नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांची पत्नी मीना शिवन, संस्थचे अध्यक्ष संजय भेगडे, कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, सहखजिनदार नंदकुमार शेलार, पीसीईटी- एनएमआयईटीचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. एस. एन. सपली आदी उपस्थित होते.
शिवन म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांनी यशामध्ये समाधानी न राहता अधिकाधिक प्रगती करावी. आत्ताच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या प्रगत प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांनी पुढे गेले पाहिजे.”
भेगडे म्हणाले की, “भारताची वाटचाल ही प्रगतीकडे जात असून प्रगत राष्ट्राच्या यादीमध्ये जाण्यास मार्गस्थ आहे याचा आनंद होत आहे.” कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. अर्चना येवले आणि विद्यार्थी देवदत्त दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले.
पोलिसांतर्फे जनजागृती
पोलिस ठाण्यात स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. पोलिस पथकाने ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पोलिस दल आणि यशस्वी करिअर ॲकॅडमीच्या सव्वाशे विद्यार्थ्यांनी मुंबई-पुणे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली. थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. पोलिस निरीक्षक प्रवीण कांबळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शहरातून दुचाकीवर तिरंगा फेरी काढण्यात आली.
भेगडे शाळेत ध्वजवंदन
तळेगाव स्टेशन ः नथूभाऊ भेगडे पाटील शाळेच्या प्रांगणात मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, कर अधिकारी कल्याणी लाडे, निरीक्षक मोनिका झरेकर, स्थापन प्रमुख नेहा पाटील, माजी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, सुरेश धोत्रे, राजेंद्र पोळ, राजेंद्र जांभूळकर आदी उपस्थित होते. यावेळी रेल्वेतील सेवानिवृत्त अधिकारी कुसुमाकर दामले यांनी नगरपरिषदेच्या शाळांना विज्ञान संच भेट दिला.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.