पिंपरी-चिंचवड

झाडतोय रिक्षावालाss गं वाट माझी झाडतोय रिक्षावालाss!

CD

तळेगाव स्टेशन, ता.१७ : रस्त्यावर मालवाहू वाहनांमधून वारंवार पडणाऱ्या खडीवर घसरुन होणारे अपघात टाळण्यासाठी तळेगाव-चाकण रस्त्यावरील मराठा क्रांती चौकातील आदर्श रिक्षा स्टँडवरील रिक्षा चालकांनी प्रशासनाकडून उपाययोजनांची वाट न पाहता स्वतः हाती खराटा घेऊन अख्खा रस्ता साफ केला. त्यांच्या याकृतीबद्दल अनेक वाहनचालकांनी त्यांना येता-जाता धन्यवाद दिले.
एरवी प्रवाशांशी अरेरावी करणारे, जादा दराने भाडे आकारणारे रिक्षाचालक आपण नेहमी पाहतो. मात्र, तळेगाव दाभाडे शहरातील आदर्श रिक्षा संघटनेचे शिस्तप्रिय रिक्षाचालक हे त्यांच्या समाजाभिमुख दृष्टिकोनामुळे कायम चर्चेचा विषय ठरत आहेत. तळेगाव-चाकण रस्त्यावरील मराठा क्रांती चौकात सिग्नलमुळे अचानक थांबणाऱ्या आणि रस्त्यावरुन वळण घेणाऱ्या डंपर, टिप्पर, आरएमसी बल्करमधून वारंवार खडी, सिमेंटचे मिश्रण,माती आणि राडारोडा रस्त्यावर सांडत असतो. बांधकाम विभाग अथवा स्थानिक नगरपरिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसते. वाहतूक विभागाकडूनही अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे ऐन वर्दळीच्या आणि सदा रहदारीच्या मराठा क्रांती चौकात रस्त्यावर पसरलेल्या खडीवर घसरुन अनेकदा दुचाकी, रिक्षा आणि छोट्या वाहनांचे अपघात होत असतात, अशा अपघातात अनेकदा वाहनचालक जखमी होताना दिसतात. डांबरी रस्त्यावर अर्ध्यापर्यंत साचलेल्या बारीक खडीवरुन दिवसभरात काही दुचाकीस्वार घसरुन पडल्याचे पाहून शेजारील आदर्श स्टॅण्डवरील रिक्षावाल्यांचे मन हेलावले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून एका जागरुक नागरिकाची भूमिका निभावत दीपक टोणगे, संतोष टकले, युसूफ पठाण आणि सहकाऱ्यांनी खराटा हातात घेऊन रस्त्यावरील खडी बाजूला सारुन भर रहदारीचा रस्ता साफ केला. अन् पुढील संभाव्य अपघात टाळले.

समाजमाध्यमांवर चर्चा
आदर्श रिक्षा संघटनेचे हेच रिक्षाचालक रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच अपघातसमयी मदतीसाठी नेहमी तत्पर असतात, असे संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोळस यांनी सांगितले. ‘रिक्षावालों के लिए, एक लाईक तो बनता है ।’ या टॅगलाईनसह समाजमाध्यमांवर या मोहिमेची चर्चा रंगली.

स्वच्छता अभियान राबवत असताना नगर परिषद प्रशासनालाही काही मर्यादा येतात. त्या अनुषंगाने नागरिकांनी सुद्धा जागरूकता दाखवत प्रशासनाला त्याला प्रतिसाद आणि पाठिंबा देऊन आपल्या परीने आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा.ही आपली जबाबदारी नाही तर कर्तव्य आहे.
- संतोष टकले (रिक्षाचालक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

SCROLL FOR NEXT