पिंपरी-चिंचवड

इंद्रधनू युवक महोत्सवात आईच्या कवितांनी विद्यार्थी भावुक

CD

तळेगाव स्टेशन, ता. ४ : अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात शुक्रवारी इंद्रधनू युवक महोत्सव आयोजित केला होता. गीतकार, लोककवी तथा संगीतकार प्रशांत मोरे यांनी सादर केलेल्या आई विषयावरील कविता ऐकून विद्यार्थी भावुक झाले.
इंद्रधनू युवक महोत्सवाचे उद्‍घाटन लोककवी प्रशांत मोरे यांच्या हस्ते झाले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. गुलाब शिंदे उपस्थित होते. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या शुभेच्छा कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रशांत मोरे यांनी स्वरचित व अन्य काही यांच्या प्रसिद्ध काव्य रचना सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली.
प्राचार्य डॉ. मलघे म्हणाले, ‘‘कवी हा शब्दांचा जादूगार असतो. शब्दांना कवेत घेऊन तो भवतालाचे चित्रण करीत असतो. आपली मराठी भाषा ही अभिजात असून, विद्यार्थ्यांनी भाषेचा अभिमान बाळगत भाषिक कौशल्ये आत्मसात करावी.’’ मराठी विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. संदीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सत्यजित खांडगे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT