पिंपरी-चिंचवड

प्रासंगिक

CD

प्रासंगिक

अविरत रुग्णसेवेची शतकपूर्ती
गणेश बोरुडे

डॉ. भाऊसाहेब सरदेसाई यांनी तळेगाव दाभाडेमध्ये सुरू केलेल्या तळेगाव जनरल हॉस्पिटलला रुग्णालयाला रविवारी (ता. ७) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. समाजसेवेच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आणि शताब्दी महोत्सव साजरा करणारी धर्मार्थ रुग्णालये भारतात हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच असतील. यानिमित्त तळेगाव जनरल हॉस्पिटलचे संस्थापक कै. डॉ. भाऊसाहेब सरदेसाई यांच्या परोपकारी वृत्तीचा घेतलेला आढावा.
---

स्वातंत्र्यपूर्व काळात गोरगरीब रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय उपचार देण्याचा विचार आणि त्यानुसार कृती करण्यासाठी योजनाबद्ध पावले टाकणारे फार कमी लोक आहेत. अशावेळी नेत्रविकार तसेच क्षयरोग झालेल्यांची वैद्यकीय सेवा करण्याचा संकल्प दिनकर सखाराम ऊर्फ भाऊसाहेब सरदेसाई यांनी केला आणि तो सिद्धीस नेला. त्यांनी सुरू केलेल्या तळेगाव जनरल हॉस्पिटलला सात डिसेंबर २०२५ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. आजही ग्रामीण भागात असलेल्या या रुग्णालयरुपी रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
भाऊसाहेबांचा जन्म १७ मार्च १८८३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गोविल या खेडेगावी झाला. त्यांनी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये सहा वर्षे अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी इंग्लंडच्या एडिंबरो येथील नेत्र रुग्णालयात काम करण्याचा अनुभव कमावला. त्यांनी १९१२ साली मुंबईत स्वतःची डॉक्टरी सुरु केली. गोरगरीब रुग्णांबद्दल त्यांना खूप तळमळ होती. यातूनच त्यांनी १९१४ मध्ये चाळीत खोल्या भाड्याने घेऊन परळच्या गिरणी कामगारांसाठी डोळ्यांचे मोफत रुग्णालय उघडले. १९३१ मध्ये के. बी. हाजी बच्चू अली चॅरिटेबल हॉस्पिटलची भव्य इमारतीची पायाभरणी महात्मा गांधी यांच्या हस्ते झाली.
भाऊसाहेबांनी तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकाजवळील पवार चाळीत खोल्या भाड्याने घेऊन नेत्र रुग्णालय सुरु केले. तेव्हा ग्रामीण भागातील सर्वच प्रकारचे रुग्ण येऊ लागल्यामुळे त्यांनी प्रसूतिगृह, शस्त्रक्रिया असे विभागही सुरू केले. पुणे प्रांताच्या तत्कालीन कलेक्टराने सरदार दाभाडे यांची ३० एकर जमीन ९९ वर्षांच्या करारावर नाममात्र भाड्याने दिल्यानंतर भाऊसाहेबांनी स्वखर्चाने इमारत बांधून २७ मार्च १९३२ रोजी रुग्णालयाचे स्थलांतर केले. १९३८ मध्ये लेडी लिनलिथगो यांच्या देणगीमुळे त्यांचे क्षयरोग रुग्णालयाचे स्वप्न साकार झाले. श्रीमंत प्रताप शेठ यांनीही देणगी दिली. १६ नोव्हेंबर १९४५ रोजी महात्मा गांधी यांनी या रुग्णालयास भेट देऊन भाऊसाहेबांच्या कार्याची प्रशंसा केली.
१९५० मध्ये भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्याहस्ते रौप्य महोत्सव झाला. भाऊसाहेबांचे १४ ऑक्टोबर १९७३ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी देहावसान झाले. त्यानंतरही रुग्णसेवेत खंड पडला नाही. १९७५ मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीत सुवर्ण महोत्सव झाला. १९७९ मध्ये गरवारे रक्तपेढी, १९८९ मध्ये नवीन नर्सिंग होम, १९९५ मध्ये एमआयटीच्या सहकार्याने ५०० खाटांचे शिक्षण रुग्णालय अशी वाटचाल झाली. २००० मध्ये नर्सिंग प्रशिक्षण केंद्र आणि नवीन नेत्ररुग्णालय सुरू झाले. शरद पवार यांच्या हस्ते अमृत महोत्सव झाला. २०२२ मध्ये कर्करोग रुग्णालयाचे उद्‍घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. २०२३ मध्ये डोळ्यांवरील उपचारासाठी फिरता दवाखाना सुरु झाला. भाऊसाहेबांचे वारसदार कॅप्टन हेमंत सरदेसाई, नितीन सरदेसाई, संगीता सरदेसाई आणि आशा सरदेसाई यांच्यासह संस्थेचे संचालक मंडळाने रुग्णसेवेचा वसा वृद्धिंगत केला आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 3rd ODI: जैस्वालचं शतक अन् विराट-रोहितची फिफ्टी; भारताने दणदणीत विजयासह मालिकाही जिंकली

IND vs SA: यशस्वी जैस्वालने केलं संधीचं सोनं, वनडेत झळकावलं पहिलं वहिलं शतक; विराट, रोहितसारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान

Latest Marathi News Live Update : मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील थोडक्यात बचावले

Mumbai News: दहिसर-भाईंदर प्रवास फक्त ५ मिनिटांत! ४५ मीटर रुंदीचा एलिव्हेटेड रोड उभारणार; बीएमसीची मोठी घोषणा

Nanded Cylinder Blast : शेतकामासाठी कुटुंब शेतात आणि घरात सिलेंडरचा स्फोट; सात लाखाचे नुकसान; तडखेल येथील घटना!

SCROLL FOR NEXT