पिंपरी-चिंचवड

मतमोजणी प्रक्रियेमुळे रविवारी तळेगावातील वाहतुकीत बदल

CD

तळेगाव स्टेशन, ता. १८ : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवीन इमारतीमध्ये रविवारी (ता. २१) होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने नागरिकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शहरातील इतर ठिकाणची वाहतूक सुरळीत पार पडावी म्हणून मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक दिवसभरासाठी स्वरूपात पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबत बुधवारी (ता. १७) अधिसूचना जारी केली. रविवारी पहाटेपासून रात्री आठ वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया समाप्त होईपर्यंत हे बदल लागू असतील. अत्यावश्यक सेवेतील पोलिस, अग्निशामक दलाचे बंब, रुग्णवाहिका तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित, तसेच भाजीपाला, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावर प्रवेशास बंदी असेल.
जिजामाता चौकाकडून तळेगाव स्टेशन चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी असेल. पर्यायी मार्ग म्हणून वाहने जिजामाता चौक-खांडगे पेट्रोल पंप (डावीकडे वळून)-बेटी बचाओ सर्कल (डावीकडे वळून)-राज मेडीकल (उजवीकडे वळून)-मारुती मंदीर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. तळेगाव स्टेशन चौकाकडून जिजामाता चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी असेल. पर्यायी मार्ग म्हणून वाहने तळेगाव स्टेशन चौक बीएसएनएल कॉर्नर (उजवीकडे वळून)-मंत्रा सिटी रोडने स्टार बाजार कार्नर (डावीकडे वळून)-जुना मुंबई पुणे महामार्ग -लिंब फाटा चौक (डावीकडे वळून)-मारुती मंदिर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
काळोखेवाडीतुन नगरपरिषदेच्या नवीन इमारतीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी असेल. पर्यायी मार्ग म्हणून वाहने काळोखेवाडी वक्रतुंड बंगला कॉर्नर (डावीकडे वळून)-आरोग्य आयुर्वेदिक क्लिनिक (उजवीकडे वळून)-बेटी बचाओ सर्कल (डावीकडे वळून)-राज मेडीकल (उजवीकडे वळून) मारुती मंदिर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
आदर्श विद्यालय गेटकडुन नगरपरिषदेच्या नवीन इमारतीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी असेल. पर्यायी मार्ग म्हणून वाहने आदर्श विद्यालय-श्रीनगरी कॉर्नर (उजवीकडे वळून)-हॉटेल ईशा कॉर्नर (डावीकडे वळून)-जिजामाता चौक मार्गे अथवा खांडगे पेट्रोल पंपा समोरून बेटी बचाओ कॉर्नरमार्गे इच्छित स्थळी जातील. वतननगरच्या बाजूकडून हिंदमाता भुयारी मार्गातून काका हलवाई कॉर्नरला येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहने स्वप्ननगरी जनसेवा वाचनालय (डावीकडे वळून) चाकण-तळेगाव महामार्गाने मराठा क्रांती चौक-तळेगाव स्टेशन चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
या तात्पुरत्या बदलाच्या अनुषंगाने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून गैरसोय टाळावी, असे आवाहन तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश लोंढे यांनी केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

Thane Crime: कल्याण हादरलं! टोमॅटो देतो सांगून स्वतःजवळ बोलावलं अन्...; ५५ वर्षीय शेखनं ७ वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य केलं

SCROLL FOR NEXT